आमदार राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल, दहीहंडीतलं वक्तव्य भोवलं

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2018 04:32 PM IST

आमदार राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल, दहीहंडीतलं वक्तव्य भोवलं

मुंबई, ता. 7 सप्टेंबर : घाटकोपर पोलिसांनी आमदार राम कदम यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या स्नेहा कुराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम यांनी मुलाला पसंत असेल आणि मुलगी नाही म्हणत असेल तर मुलीला पळवून आणतो असं विधान केलं होतं. त्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केली होती. मात्र घाटकोपर पोलीस गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नव्हते.

त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं घाटकोपर पोलीस स्टेशन समोर आंदोलन सुरू केलं. गेल्या 72 तासांपासून हे आंदोलन सुरू होतं. कदम यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करावी अशी राष्ट्रवादीची मागणी होती. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी आज पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याची तयारी पोलिसांनी दाखवली.

कलम 504 नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीने आपलं आंदोलन मागे घेतलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता हायकोर्टात जाणार असून राम कदम यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करावी अशी मागणी करणार आहे.

राम कदमांची पाठराखण

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राम कदम यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. राम कदम यांनी माफी मागितली आहे. कदम यांची कारकिर्द मोठी आहे. त्यांनी अनेक महिलांना मदत केलीये. त्यांच्या मतदारसंघात त्यांना हजारो महिला राखी बांधत असतात. त्यामुळे एखाद्या वाक्यामुळे इतका गदारोळ करण्याची आवश्यकता नाहीये. आता त्यांनी माफी मागितली विषय संपवला पाहिजे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राम कदम यांना पाठीशी घातलं. तसंच राम कदम यांना प्रवक्तेपदावरून काढावं या मागणीवर प्रदेशाध्यक्ष रावसादेब दानवे निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं.

शुभमंगल सावधान : गीता-सूर्याच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का?

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close