भोंदू बाबांची यादी जाहीर करणारे महंत मोहनदास बेपत्ता

महंत मोहनदास 15 सप्टेंबरला हरिद्वारहून मुंबईसाठी निघाले होते. त्यांनी ट्रेनही पकडली होती. पण त्यानंतर ते मुंबईला पोचलेच नाहीत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2017 12:36 PM IST

भोंदू बाबांची यादी जाहीर करणारे महंत मोहनदास बेपत्ता

त्र्यंबकेश्वर,26 सप्टेंबर: आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत मोहनदास बेपत्ता झाले आहेत. त्यांचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येते आहे.

महंत मोहनदास 15 सप्टेंबरला हरिद्वारहून मुंबईसाठी निघाले होते. त्यांनी ट्रेनही पकडली होती. पण त्यानंतर ते मुंबईला पोचलेच नाहीत. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तराखंड हरिद्वारचे विशेष पथक त्यांचा शोधही घेतं आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वरला आखाडा परिषदेची बैठकही घेण्यात आली.

बाबा राम रहिम यांना अटक झाल्यावर देशातील भोंदू बाबांची यादी महंत मोहनदास यांनी जाहीर केली होती.त्यानंतर त्यांना धमक्यांचे फोनही येत होते.यामुळेच त्यांचं अपहरण झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 10:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...