महाराष्ट्रात शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार, 'या' भागांत पुढचे 5 दिवस कोरड

महाराष्ट्रात शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार, 'या' भागांत पुढचे 5 दिवस कोरड

राज्यात अनेक भागात पुढचे 5 दिवस कोरड राहिल अशी माहिती वेधशाळेकडून देण्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार ऐवढं नक्की.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : गेल्या 3-4 दिवसांनी महाराष्ट्राच्या काही राज्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली तर अनेक भागात अजूनही लोक चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि खेड-रत्नागिरीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यात पुढचे 5 दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर भारत आणि ईशान्य भारतात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पण काही ठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कमीच आहे. अशीच परिस्थिती पुढचे काही दिवस असणार आहे. राज्यात अनेक भागात पुढचे 5 दिवस कोरड राहिल अशी माहिती वेधशाळेकडून देण्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार ऐवढं नक्की.

मोसमात एकदा-दोनदा तरी मान्सूनचा अक्ष बदलला जातो. त्यामुळे मुसळधार पावसानंतर आता काही ठिकाणी पावसाची विश्रांती असणार आहे तर तोच पाऊस पुन्हा सक्रिय होईल अशी माहिती वेधशाळेकडून देण्यात आली आहे. खरंतर मराठवाडा आणि विदर्भ भागात असाही कमी प्रमाणात पाऊस पडतो. असं असताना यंदा मान्सूनने 2 आठवडे उशिराने हजेरी लावली. त्यामुळे या भागात पाण्याची कमतरता असू शकते.

दरम्यान, मुंबई, कोकण, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी अशा अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प झाला होता. खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून वाहतूक थांबवण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांनी आणि धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कोकणातही वैभववाडीला जाणारा मार्ग सुरक्षेसाठी बंद करण्यात येणार होता. सध्या रस्त्यावर अर्धा फूट पाणी साचलं आहे. राधानगरी धरण 62 टक्के भरलं आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर आली आहे.

आंबा, दाजीपूर भागात दिवसभर मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे अनेक घरांत पाणी गेलं आहे. रस्त्यांवर पाणी असल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर शहरातही पावसाची संततधार कायम असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

खेड - रत्नागिरीमध्ये गेल्या 5 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील नारंगी आणि जगबुडी नदीला पूर आला होता. तर खेड-दापोली मार्गावर खेडमधील एकविरा नगर येथे रस्त्यावर 5 फूट पाणी साचल्याने मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. अनेक अंतर्गत मार्ग बंद करण्यात आले होते.

ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बदलापूरजवळील बारवी धरण 52 टक्के भरले आहे. दोन आठवडयापूर्वी अवघा 13 टक्के पाणी साठा या धरणात होता. मात्र, बारवी धरण क्षेत्रात गेल्या दोन आठ्वड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे हे धरण 52 टक्के भरलं आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत ११०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 24 तासांमध्ये तलावातील पाणीसाठ्यात लक्षणिय वाढ झाली आहे. मात्र,  गेल्यावर्षीपेक्षा पाणीसाठा अडीच टक्क्यांनी कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी आहे.

SPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 07:42 AM IST

ताज्या बातम्या