News18 Lokmat

भारतात फोन धारकांची संख्या 97 कोटी पार ! वर्षभरात 83 लाखांनी वाढ

यावर सीओएआयच्या अहवालामुळे पुन्हा शिक्कामोर्तब झाले. सीओएआयने या अहवालात मोबाइल आणि लँडलाइन अशा दोन्ही प्रकारच्या धारकांचा अभ्यास केला.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2018 12:00 PM IST

भारतात फोन धारकांची संख्या 97 कोटी पार ! वर्षभरात 83 लाखांनी  वाढ

08 जानेवारी:   भारतातील दूरध्वनीधारकांची संख्या ९७.५४ कोटींवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात झाली. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने या संबंधीचा अहवाल सादर केला आहे. भारतात शौचालयांपेक्षा मोबाइल अधिक असल्याचा विषय अनेकदा चर्चीला गेला. यावर सीओएआयच्या अहवालामुळे पुन्हा शिक्कामोर्तब झाले. सीओएआयने या अहवालात मोबाइल आणि लँडलाइन अशा दोन्ही प्रकारच्या धारकांचा अभ्यास केला.

हे दोन्ही मिळून देशातील दूरध्वनीधारकांची संख्या ९७ कोटींच्या पार  गेली आहे. यामध्ये एअरटेलचा हिस्सा सर्वाधिक २९.६८ टक्के आहे.रिलायन्स जिओने  थोड्याश्या काळात  १४.९६ टक्के बाजारी हिस्स्याची मजल मारली आहे, तर सरकारी बीएसएनएल आणि एमटीएनएलचा बाजारी हिस्सा एक टक्क्यांच्या खाली आहे.

फक्त मोबाइलधारकांचा विचार केल्यास, पूर्व उत्तर प्रदेश मंडळ यात अव्वल राहिले आहे.

देशातील एकूण मोबाइलधारकांपैकी ८.४९ कोटी धारक हे या मंडळातील आहेत. महाराष्ट्राचा क्रमांक त्यानंतर दुसरा असून, महाराष्ट्र (मुंबई वगळून) मंडळात ८.१५ कोटी मोबाइलधारक आहेत.

टेलिकॉम हे देशाच्या सर्वसमावेश आर्थिक विकासाचे क्षेत्र आहे. प्रत्येकाचा यांत सहभाग असल्याने प्रत्येक दूरध्वनी अथवा मोबाइलधारक हा अप्रत्यक्षपणे या आर्थिक विकासाचा वाटेकरी ठरतो. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला दूरवर पोहोचविण्यात मोबाइलची भूमिका महत्त्वाची आहे. येत्या काळातही टेलिकॉम उद्योग यासाठी कटिबद्ध असेल, असे मत सीओएआयचे महासंचालक रंजन मॅथ्यूज यांनी व्यक्त केले.

Loading...

भारतात 97.54 कोटी फोनधारक

- मोबाईल आणि लँडलाईन फोनचा समावेश

- उत्तर प्रदेश (पूर्व) सर्कलमध्ये सर्वाधिक धारक

- उत्तर प्रदेश (पूर्व) सर्कलमध्ये 8.49 कोटी धारक

- महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, 8.15 कोटी फोनधारक

- 8.15 कोटी या संख्येत मुंबईचा समावेश नाही

- नोव्हेंबर 2017पर्यंतची आकडेवारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...