मोदीनामाचा उन्माद नको, सामनातून भाजपवर टीका

मोदीनामाचा उन्माद नको, सामनातून भाजपवर टीका

ऊठसूट मोदी मोदी अशा आरोळ्या ठोकून काही बाटगे पंतप्रधानांची अप्रतिष्ठाच करीत आहेत. अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलीय.

  • Share this:

मुंबई, 6 जुलै: मुंबई महापालिकेत जीएसटीचा धनादेश देतेवेळी भाजपकडून झालेल्या घोषणाबाजीचा आजच्या 'सामना' दैनिकातून खरपूस समाचार घेण्यात आलाय.

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आम्हीही त्यांचा गौरव करतो पण, ऊठसूट मोदी मोदी अशा आरोळ्या ठोकून काही बाटगे पंतप्रधानांची अप्रतिष्ठाच करीत आहेत. अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलीय. शहिदांच्या अंत्ययात्रेतही मोदीभक्त असाच मोदीनामाचा गजर करून पंतप्रधानांचा अपमान करणार का असा खडा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय.

इंदिरानामाच्या आरोळ्या कधीकाळी अशाच ठोकल्या जात होत्या. इंदिरा इज इंडिया अशा घोषणा देऊन इंदिराभक्तांनी तेव्हा भारतमातेचाच अपमान केला होता. त्या अपमानाच्या ठिणगीतूनच क्रांतीचा वणवा पेटला आणि इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला होता, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात बुधवारी शिवसेना आणि भाजपमध्ये 'राडा' झाला होता. जीएसटीचा धनादेश महापालिकेला सुपूर्द करण्याच्या सोहळ्यात त्यांच्यात जोरदार घोषणायुद्ध पाहायला मिळालं होतं. भाजपचे नगरसेवक 'मोदी-मोदी' असा गजर करू लागताच, शिवसैनिकांनी 'चोर है, चोर है'च्या आरोळ्या ठोकल्या होत्या. या संपूर्ण तमाशाबाबत शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 12:28 PM IST

ताज्या बातम्या