अहमदाबादमध्ये अमित शहा-नारायण राणेंची भेट नाही -मुख्यमंत्री

अहमदाबादमध्ये अमित शहा-नारायण राणेंची भेट नाही -मुख्यमंत्री

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि नारायण राणे यांची भेट झाली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केलंय

  • Share this:

13 एप्रिल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजप प्रवेशाच्या चर्चाला आता अहमदाबाद कनेक्शन जोडलं गेलं. पण, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि नारायण राणे यांची भेट झाली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केलंय.

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल हालचालींना वेग आलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री अमित शहांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये एक तास राणेंबद्दलच चर्चा झाल्याचं समजतंय. एवढंच नाहीतर स्वतः नारायण राणेंही अहमदाबादमध्ये होते. मात्र, नारायण राणे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन लोकमतला दिली. परंतु, नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचं टाळलं. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेश अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 09:50 AM IST

ताज्या बातम्या