S M L

हिंगोलीमध्ये स्त्रीरोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही, बाळंतिणी झोपल्या रस्त्यावर

हिंगोलीच्या वसमत तालुक्यात एक भयानक गोष्ट समोर आलीये. वसमत तालुक्यातलं सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या स्त्री रोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाहीये.

Sonali Deshpande | Updated On: Jun 24, 2018 12:58 PM IST

हिंगोलीमध्ये स्त्रीरोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही, बाळंतिणी झोपल्या रस्त्यावर

हिंगोली, 24 जून : हिंगोलीच्या वसमत तालुक्यात एक भयानक गोष्ट समोर आलीये. वसमत तालुक्यातलं सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या स्त्री रोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाहीये.  विजेची तार तुटल्यानं ही नामुष्की ओढावलीये. आणि याचा परिणाम म्हणजे नुकत्याच बाळंतीण झालेल्या महिला चक्क रस्त्यावर झोपल्या आहेत.

हेही वाचा

वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या मुलगा,नातवाला अटकसौदी महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, दशकांपासूनची ड्रायव्हिंगवरची बंदी उठवली

कालची रात्रही त्यांनी तशीच काढली. नवजात बाळांना घेऊन रस्त्यावर झोपावं लागणं ही महाराष्ट्रासह देशासाठीच शरमेची बाब आहे. पण प्रशासन नेहमीप्रमाणं ढिम्म आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, त्यांच्या आणि बाळांच्या प्रकृतीचा प्रश्न याबाबत कुणालाच काही फरक पडत नाही असं दिसतंय.

आरोग्य विभागासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद होते, तरीही बाळंतीण बाईला रात्र रस्त्यावर काढावी लागतेय. हा भाग जंगली परिसरात येतो. इथं रात्रीच्या वेळेस जंगली जनावरंही फिरतात.

Loading...
Loading...

हेही वाचा

FIFA World Cup 2018 : टोनी क्रूसच्या गोलच्या बळावर जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2018 12:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close