S M L

मजूर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी चक्क पिटली दवंडी

खान्देशासोबतच जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करण्यात येते आहे. कापसाच्या वेचणीचा सध्या हंगाम सुरु आहे. मात्र पावसाळा लांबलेला आहे. वाळीत कापूस वेचणीला आल्यानं मजूर मिळणं कठीण झालंय.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 30, 2017 01:39 PM IST

मजूर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी चक्क पिटली दवंडी

जळगाव,30 ऑक्टोबर: कपाशीच्या कामासाठी मजूर मिळावा म्हणून खान्देशातील शेतकऱ्यांनी दवंडी पिटली आहे.कपाशीच्या वेचणीसाठी मजूरांचा हा शोध सुरू आहे.

खान्देशासोबतच जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करण्यात येते आहे. कापसाच्या वेचणीचा सध्या हंगाम सुरु आहे. मात्र पावसाळा लांबलेला आहे. वाळीत कापूस वेचणीला आल्यानं मजूर मिळणं कठीण झालंय. आाता ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या निर्माण होऊन बसली आहे. गावोगावी जाऊन शेतकरी मजुरांचा शोध घेत आहेत. मात्र तरीही मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी मजुरांना साद घालण्यासाठी गावात चक्क दवंडी पिटण्यास सुरुवात केलीय. मजूर मिळवण्यासाठी केलेला दवंडीचा वापर हा सध्या जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय.

त्यामुळे आता दवंडी पिटून तरी मजूर मिळतात का पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 01:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close