करकरे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची याचिका हायकोर्टाने निकाली काढली

एटीएस प्रमुख करकरे यांचा 26/11च्या दरम्यान गोळी लागून मृत्यू झाला होता. करकरे यांच्या मृत्यूमागे कडवी विचारसरणी असलेल्या उजव्या संघटना असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2018 08:59 PM IST

करकरे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची  याचिका हायकोर्टाने निकाली काढली

28 जानेवारी: २६/११ च्या हल्ल्यात राज्याचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टानं निकाली काढली आहे. यामुळे आता याचिकाकर्ते पुढे काय करतात हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

एटीएस प्रमुख करकरे यांचा 26/11च्या दरम्यान गोळी लागून मृत्यू झाला होता. करकरे यांच्या मृत्यूमागे कडवी विचारसरणी असलेल्या उजव्या संघटना असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. या आशयाचं एक पुस्तकही प्रकाशित झालं आहे. बिहारमधील माजी आमदार राधाकांत यादव यांनीही याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची विशेष एसआयटीची स्थापन करुन चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. या प्रकरणात चौकशी करण्यात काहीच तथ्य नाही अशी भूमिका कोर्टाने घेतली आहे.

मालेगाव प्रकरणात करकरे यांनी उजवी विचारसरणी असलेल्या संघटनेच्या सदस्यांना अटक केली होती. त्यामुळेच या संघटनांचा करकरे यांच्या मृत्यूत हात असल्याचा दावा यादव यांनी आपल्या याचिकेत केला होता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2018 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...