बेळगावात आज मराठी भाषिकांचा मोर्चा, सेनेच्या नेत्यांना प्रवेश नाही

कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा कायम

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 25, 2017 01:02 PM IST

बेळगावात आज मराठी भाषिकांचा मोर्चा, सेनेच्या नेत्यांना प्रवेश नाही

25 मे : 'जय महाराष्ट्र'वरून कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. 'जय महाराष्ट्र'च्या घोषणेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याविरोधात सीमाभागातील बांधवांनी आयोजीत केलेल्या मोर्चात शिवसेनेचे मंत्री सहभागी होणार आहेत. मात्र, कर्नाटक सरकारने आपला अडमुठेपणा कायम ठेवत महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे आज (गुरूवारी) बेळगावात होणाऱ्या मोर्चात शिवसेनेचे मंत्री उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे.

काल रात्री उशीरा कर्नाटक सरकारने जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत आदेश काढला आहे. या आदेशानुसार परिवाहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना 24 ते 27 मे पर्यंत बेळगावात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. पण शिवसेनेचे मंत्री हे आदेश झुगारून मोर्चात सहभागी होतात का याची उत्सुकता आहे.

कर्नाटकात लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणण्यास बंदी करण्यात येणार असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांनी केलं होतं.त्याचे तीव्र पडसाद बेळगाव आणि महाराष्ट्रात उमटलेत. या भूमिकेचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र एकिकरण समिती आणि शिवसेना आज मोर्चा काढणारे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 09:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...