S M L

परिवहन मंडळाची माघार, संपादरम्यान रजा दाखवली तर वेतन कपात नाही !

"जे कर्मचारी संपकाळातील ४ दिवसांसाठी ८ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही"

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2017 08:36 PM IST

परिवहन मंडळाची माघार, संपादरम्यान रजा दाखवली तर वेतन कपात नाही !

31 आॅक्टोबर : चार दिवसांचा संप करण्याच्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कपात करण्याच्या निर्णय घेणाऱ्या परिवहन मंडळाने अखेर माघारी घेतलीये. संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार हा दंड म्हणून कपात करण्यात येईल, किंवा जे कर्मचारी संपकाळातील ४ दिवसांसाठी ८ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या काळात 4 दिवसांचा संप पुकारला होता. मात्र, काल सोमवारी परिवहन महामंडळाने  संपाच्या नुकसानीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने संपकरी कर्मचाऱ्यांच्या पगार कापला जाणार आहे. एक दिवस संपाचा दंड म्हणून 7 दिवसांचा पगार कापणार असा निर्णय घेतला होता. मात्र, आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निर्णयात बदल केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्रास सोसावा लागू नये यासाठी नुकत्याच झालेल्या संपाच्या बाबतीत या निर्णयास स्थगिती देण्याचा निर्णय मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांनी यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने या दाव्याचा निर्णय लागेपर्यंत ३६ दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे, असंही रावतेंनी सांगितलं.

दर दिवसाचा पगार टप्प्याटप्प्याने चार महिन्यात कपात करण्यात येईल. तथापी, जे कर्मचारी ८ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही, असंही रावतेंनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 08:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close