आधीचं सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार -नितीन गडकरी

ज्या लोकांनी महाराष्ट्रात 30 वर्ष राज्य केलं ते लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जास्त जबाबदार आहेत असं म्हणत भाजप नेते नितीन गडकरींनी भाजप सरकारवरची जबाबदारी सोयिस्कररित्या झटकलीय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2017 07:52 PM IST

आधीचं सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार -नितीन गडकरी

26 एप्रिल : ज्या लोकांनी महाराष्ट्रात 30 वर्ष राज्य केलं ते लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जास्त जबाबदार आहेत असं म्हणत भाजप नेते नितीन गडकरींनी भाजप सरकारवरची जबाबदारी सोयिस्कररित्या झटकलीय. तसंच राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होऊन 50 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आल्याशिवाय राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत असंही ते म्हणाले.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नितीन गडकरी यांनी विरोधकांच्या संघर्षयात्रेला फैलावर घेतलं.

काय होतास तू, काय झालास तू असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही टोला लगावला. जे कधी गाडीच्या काचा खाली करत नव्हते, ते आज रस्त्यावर उतरून संघर्ष करताय याच हसूं येतं अशी खिल्लीही त्यांनी उडवली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना राज्यातील सिंचन क्षेत्र 16 ते 17 टक्क्यांनी वाढलं तरीही शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न सुटण्यासारखे आहेत असं ते म्हणाले.

'आप'वर टीका

जनता छप्पर फाडुन देते, पण वेळ आली तर झाडू मारून नेते हे याद राखा. दोन वर्षांपूर्वी ज्यांनी दिल्लीत सत्ता मिळाली त्याची दोन वर्षात कशी वाताहत झाली. दिवस बदलत असतात. अहंकार ठेऊ नका असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Loading...

'नळावरच्या भांडणं करू नका'

आमदाराला अस वाटतं की, माझ्या शिवाय दुसरा कोणी नाही, असं वागू नका, जेव्हा बँड वाजेल त्यावेळी कुणी सोबत राहणार नाही. हे लक्षात घ्या, अहंकार गर्व, छोट्या गोष्टीत लक्ष घालू नका, नळाच्या भांडणावर ची लढाई करू नका. मन मोठं ठेवा असा सल्लाही नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...