...आणि नितीन गडकरींनी 'वाडा' सोडला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2017 08:29 PM IST

...आणि नितीन गडकरींनी 'वाडा' सोडला

14 आॅक्टोबर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी महाल परिसरातील वाडा सोडला आहे. पुर्व नागपुरातील गडकरी वाडा नव्याने बांधण्यात येणार असून यादरम्यान रामनगरातील बंगल्यात गडकरी कुटुंबिय वास्तव्यास गेले आहे.

भारतीय जनता पार्टीत पोस्टर चिपकवण्यापासून ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता केंद्र सरकारमधील हेवी व्हेट मंत्री असा प्रवास नितीन गडकरींनी या वाड्यातूनच पूर्ण केला आहे. पिढीजात असलेला महाल परिसरातील हा वाडा दहा वर्षांपूर्वी विस्तिर्ण करण्यात आला. पण गडकरींचा लोकसंपर्क बघता या वाड्यात होणारी गैरसोय पाहता वाडा नव्याने बांधण्य़ाचा निर्णय घेण्यात आल्याच गडकरींच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलंय.

दरम्यान, या वाड्यात नितीन गडकरीच नव्हे तर त्यांच्या जवळच्या आणि भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आठवणी या वाड्यासोबत जुळल्या आहेत. पुर्व नागपूर पश्चिम नागपुरच्या तुलनेत कमी विकसित समजल जात असतांना नितीन गडकरींनी आपले वास्तव्य महाल मधील वाड्यातच ठेवले.

कधीही महाल भागातील वाड्यातील वास्तव्य सोडणार नाही विकास पुर्व नागपुराचाच विकास करू असे गडकरींनी अनेकदा मुलाखती मध्ये सांगितलंय. पण वाड्याच्या दुरुस्तीच्या कारणामुळे किमान वर्ष दोन वर्षे गडकरी आता पश्चिम नागपूरचे रहिवाशी झाले आहे.

Loading...

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पश्चिम नागपुरातील धरमपेठेतील त्रिकोणी पार्क परिसरातील घरही पाडून नवीन बांधले जात आहे. नितीन गडकरींनी याच्या वाड्याचे राजकीयदृष्ट्या खूप महत्व आहे कारण गडकरी यांनी राजकारणातील अनेक महत्वाचे निर्णय याच वाड्यावर घेतले आहे.​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2017 08:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...