नागपूर महापालिकेकडे पूर्वी विष घ्यायला पैसे नव्हते, मेट्रोला काय देणार? - गडकरी

नागपूर महापालिकेकडे पूर्वी विष घ्यायला पैसे नव्हते, मेट्रोला काय देणार? - गडकरी

देशातल्या सर्व मेट्रो प्रकल्पांमध्ये नागपूर मेट्रो ही सर्वात इनोव्हेटीव्ह असल्याचा दावाही त्यांनी केला.

  • Share this:

नागपूर 7 मार्च  : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  बोलायला बिनधास्त आहेत. बेधडक आणि परिणामाची चिंता न करता ते आपली मतं व्यक्त करतात. गुरूवारी नागपूर मेट्रोचं उद्घाटन झालं त्या कार्यक्रमातही गडकरींनी असच एक धाडसी विधान करत सत्य परिस्थिती सांगितली. एकेकाळी नागपूर महानगरपालिकेकडे विष घ्यायलाही पैसे नव्हते तेव्हा मेट्रो साठी लाखो रुपये कुठून देणार असं परखडपणे त्यांनी सांगून टाकालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांनी नवी दिल्लीतून रिमोट कंट्रोलने या मेट्रोचं लोकार्पण केलं. त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, नागपूर मेट्रोसाठी कोट्यवधी रुपयांची गरज होती. मात्र महापालिकेकडे तेवढे पैसे कुठून येणार? त्यामुळे महापालिकेच्या मोक्याच्या जागेवर असलेलं अतिक्रमण हटवून आम्ही 150 कोटींची जागा मेट्रोसाठी दिली आणि प्रकल्प मार्गी लागला.


देशातल्या सर्व मेट्रो प्रकल्पांमध्ये नागपूर मेट्रो ही सर्वात इनोव्हेटीव्ह असल्याचा दावाही त्यांनी केला. या मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरच्या विकासाला दिशा मिळेल असंही ते म्हणाले. अन्य काही कामांमुळे मला यावेळी नागपूरला येता आलं नाही मात्र दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला नक्की येईल असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधानांना दुसऱ्या टप्प्यासाठी नागपूरला येण्याचं आवाहन केलं होतं.

नागपूर मेट्रोच्या पहिल्या व्यावसायीक मेट्रो ट्रेनचे सारथ्य महिला करत आहे. सुमेधा मेश्राम या पायलट ही ट्रेन चालवित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वेळेत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 07:54 PM IST

ताज्या बातम्या