हिंमत असेल तर शिवाजी पार्कवर चर्चेला या, नितीन गडकरींचं राज ठाकरेंना थेट आव्हान!

हिंमत असेल तर शिवाजी पार्कवर चर्चेला या, नितीन गडकरींचं राज ठाकरेंना थेट आव्हान!

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या महामेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट चर्चेचं आव्हान दिलं. हिंमत असेल तर विकासाच्या कामांवर चर्चा करण्यासाठी शिवाजी पार्कवर या असं आव्हान त्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता दिलं .

  • Share this:

मुंबई,ता.06 एप्रिल : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या महामेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट चर्चेचं आव्हान दिलं. हिंमत असेल तर विकासाच्या कामांवर चर्चा करण्यासाठी शिवाजी पार्कवर या असं आव्हान त्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता दिलं . मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी नितीन गडकरींवर जोरदार टीका करत गडकरींची आश्वासनं म्हणजे साबनाचे फक्त बुडबुडे आहेत असं म्हटलं होतं.

नितीन गडकरी हे नेहमी आपल्या भाषणात फक्त लाखो कोटींची आश्वासनं देतात काम काहीच होत नाही अशी टीका राज यांनी केली होती. गडकरींनी आज महामेळाव्याची संधी साधत राज ठाकरेंच्या आरोपांची परतफेड केली. आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेले 108 सिंचन प्रकल्प येत्या दीड वर्षात पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले. विकास कामांसाठी महाराष्ट्राला पाच लाख कोटी रूपये देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2018 03:44 PM IST

ताज्या बातम्या