Elec-widget

नितीन आगे खून खटला नव्याने चालवा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

नितीन आगे खून खटला नव्याने चालवा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

सर्व साक्षीदारांची साक्ष पुन्हा नोंदवली जाणार आहे. पुरावेही नव्याने सादर करावे लागतील. आणि विशेष म्हणजे, फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाई होणार आहे.

  • Share this:

20 डिसेंबर: अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्ड्यामध्ये घडलेल्या नितीन आगे खून प्रकरणात नव्यानं खटला चालवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

सर्व साक्षीदारांची साक्ष पुन्हा नोंदवली जाणार आहे.  पुरावेही नव्याने सादर करावे लागतील.  आणि विशेष म्हणजे, फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाई होणार आहे. एवढंच नाही, तर कोर्टानं आगे कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचेही आदेश दिलेत. नितीन आगे खून प्रकरणात अहमदनगर सत्र आणि जिल्हा न्यायालयानं सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर नितीनच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज कोर्टानं खटला पुन्हा चालवण्याचे आदेश दिलेत. नितीन आगे या विद्यार्थ्याची खर्ड्यामध्ये हत्या करण्यात आली होती.

नितिन आगे खून प्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालणार. संपूर्ण साक्षीदारांचे नव्याने साक्ष घेऊन,नव्याने पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.  फितूर साक्षीदारांविरोधात कारवाईचे निर्देश देण्यात आले  आहेत. आगे यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...