S M L
Football World Cup 2018

ऑईल रिफायनरी मार्गी लावण्यास अधिकारी आलाच तर परत जाणार नाही-नितेश राणेंची धमकी

ऑईल रिफायनरिसंबंधी कोणतही काम होऊ देणार नसल्याचा इशारा देखील नितेश राणे यांनीं दिलाय .

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 14, 2018 05:11 PM IST

ऑईल रिफायनरी  मार्गी लावण्यास अधिकारी आलाच तर परत जाणार नाही-नितेश राणेंची धमकी

14 जानेवारी: ऑईल रिफायनरी मार्गी लावण्यासाठी कितीही मोठा अधिकारी जर गिर्ये रामेश्वर भागात आला तर तो परत घरी जाणार नाही  अशी खुली धमकीच नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. ते सिंधुदुर्गाच्या गिर्ये रामेश्वर भागात  एका सभेत बोलत होते.

ऑईल रिफायनरीच्या मुद्द्यावरून कोकणातलं  राजकारण सध्या पेटतं आहे. ऑईल रिफायनरीजसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सरकारचे काही अधिकारी  अधिग्रहणासाठी या भागात येत आहेत. या अधिकाऱ्यांनाच  अशी धमकी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. सिंधुदुर्गात गिर्ये गावात झालेल्या ऑईल रिफायनरिज विरोधात ही सभा आयोजित करण्यात आली होती.    महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या या रिफायनरिविरोधी सभेला माजी खासदार निलेश राणेही हजर होते. आपल्यावर कितीही केसेस टाका पण आपण या भागाचा आमदार असेपर्यंत ऑईल रिफायनरिसंबंधी कोणतही काम होऊ देणार नसल्याचा इशारा देखील नितेश राणे यांनीं दिलाय .

आता या ऑईल रिफायनरिजच्या  मुद्द्यावरून राजकारण काय वळण घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2018 05:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close