मित्र पक्ष ठरत आहेत डोकेदुखी; शिवसेना-भाजप छोट्या भावांचा हट्ट पुरवणार?

भाजपविरोधात छोट्या पक्षांच्या नाराजीचा फायदा उचलण्यासाठी आता काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2019 10:29 AM IST

मित्र पक्ष ठरत आहेत डोकेदुखी; शिवसेना-भाजप छोट्या भावांचा हट्ट पुरवणार?

मुंबई, 14 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपनं युती केली. पण, मित्र पक्षांकडे दुर्लक्ष केल्यानं आता मित्र पक्षांनी देखील भाजपला आव्हान देण्याचा पवित्रा घेतला आहे. चार दिवसांपूर्वी राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी भेट घेत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केला होती. पण, आता मात्र राजू शेट्टी यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीशी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्गमध्ये देखील शिवसेना – भाजप युती झाल्यानं नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं थेट भाजपला आव्हान देत लोकसभेच्या रिंगणात निलेश राणे यांना उतरवलं आहे. दरम्यान, छोट्या पक्षांनी देखील आता निवडणुकीसाठी तयारी केली आहे. याच पार्श्वभूमिवर काँग्रेस आमदार नितेश राणे महादेव जानकर यांची भेट घेणार आहेत. भाजपकडून सन्मान मिळत नसल्यानं नाराज पक्ष आता एकत्र येत आहेत. परिणामी, आता भाजपवर दबाव वाढवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.


कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना-भाजप काय करणार?


Loading...

घटक पक्ष नाराज

2014मध्ये छोट्या पक्षांना एकत्र घेत शिवसेना – भाजपनं लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात 42 जागा जिंकल्या होत्या. पण, 2019मध्ये छोट्या पक्षांकडे भाजपनं दुर्लक्ष केलं आहे. पण, छोट्या पक्षांच्या दबावाला भाजप कशा रितीनं हातळणार हे पाहावं लागणार आहे. तसेच 2019मध्ये छोट्या पक्षांच्या नाराजीचा निकालांवर काय परिणाम होणार हे देखील पाहावं लागणार आहे.


नाराज राजू शेट्टींची आघाडी सोबत हातमिळवणी; दोन जागा मिळण्याची शक्यता


7 टप्प्यांमध्ये निवडणुका

लोकसभेच्या निवडणुका या 7 टप्प्यांमध्ये होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहे. लोकसभेत राज्यात 45 जागा जिंकण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर देत असून त्यांच्यातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

VIDEO: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी निश्चित?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2019 10:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...