राणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट

राणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट

दोघांनीही एकमेकांवर आक्रमक टीका केली आहे. नितेश राणे यांनी शुक्रवारी एक ट्विट करत रामदास कदम यांना कुत्र्याची उपमा दिली होती.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : काँग्रेस आमदार नितेश राणे आणि पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील वाद आणखीनच चिघळला आहे. दोघांनीही एकमेकांवर आक्रमक टीका केली आहे. नितेश राणे यांनी शुक्रवारी एक ट्वीट करत रामदास कदम यांना कुत्र्याची उपमा दिली होती. त्यानंतर भडकलेले रामदास कदम आज म्हणाले की, 'नितेश हाच कुत्रा आहे.'

रामदास कदम यांनी नितेश राणे यांच्यावर केलेल्या पलटवारानंतर नितेश यांनी पुन्हा एक जहरी ट्वीट केलं आहे. राणे-कदम वादातून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती ढासळत आहे, याची कल्पना येते, अशी प्रतिक्रिया आता राजकीय विश्लेषक देत आहेत.कोकणातील रामदास कदम विरुद्ध राणे हा वाद सर्वश्रुत आहे. रामदास कदम यांनी एका कार्यक्रमात राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर राणेंचे सुपुत्र नितेश यांनीही आता वादग्रस्त ट्वीट करत याआधीही उत्तर दिलं होतं.काय म्हणाले होते रामदास कदम?

नारायण राणे यांची शिवसेनेवर बोलण्याची करण्याची लायकी नसल्याची टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदम यांनी नारायण राणेंवर शाब्दिक हल्लाबोल केला.

'नारायण राणे आधी काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर भाजप झालं. आता आठवलेंचा पक्ष बाकी आहे,' असा टोलाही कदम यांनी राणेंना लगावला. ज्या शिवसेनेच्या जीवावर नारायण राणे यांनी हे वैभव कमावलं त्या राणेंची 'मातोश्री'वर बोलण्याची औकात आहे का, असंही कदम म्हणाले. तसंच नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग रामदास कदम धुतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.


दीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं? पाहा Special Report

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2018 02:12 PM IST

ताज्या बातम्या