नितेश राणेंना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचा पाठिंबा; 16 जुलैला जेलभरो

नितेश राणेंना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचा पाठिंबा; 16 जुलैला जेलभरो

नितेश राणे यांच्या समर्थनार्थ आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे देखील रस्त्यावर उतरली आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग, दिनेश केळुसकर, 09 जुलै : मुंबई – गोवा हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर आमदार नितेश राणे यांनी चिखल ओतला. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयानं पोलीस कोठडीत केली. दरम्यान, या साऱ्या प्रकरणावर उलट-सुलट प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. त्यावर आता कोकणातील राजकीय वातावरण देखील ढवळून गेलं आहे. आमदार नितेश राणे यांच्या समर्थनार्थ कणकवलीत व्यापाऱ्यांनी बंद देखील पाळला. तोच त्यांना मिळणार राजकीय पाठिंबा देखील वाढताना दिसत आहे. कारण, 16 जुलै रोजी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जेलभरो आंदोलन करणार आहेत. त्यामुळे आता सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी चिखल फेकल्यानंतर शेडेकर यांच्या कुटुंबीयांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मुंबई काँग्रेसमधील धुसफुस दिल्ली दरबारी; संजय निरूपमांवर हायकमांड नाराज !

जामीन मिळणार?

दरम्यान, नितेश राणे यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यांना जामीन मिळणार का? याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई – गोवा हायवेचं सध्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील समोर आल्या. त्यानंतर गुरूवार 4 जुलै रोजी नितेश राणे यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असा सवाल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतून त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी नितेश राणे यांनी 15 दिवसांत समस्या सोडव अशी तंबी देखील अभियंता प्रकाश शेडेकर यांना दिली होती.

VIDEO: किरकोळ कारणावरून 2 युवकांना बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 01:41 PM IST

ताज्या बातम्या