S M L

ब्राह्मोस प्रकरणाला नवे वळण, निशांत अग्रवालच्या पत्नीचा फोन-लॅपटाॅप जप्त

Updated On: Oct 11, 2018 06:25 PM IST

ब्राह्मोस प्रकरणाला नवे वळण, निशांत अग्रवालच्या पत्नीचा फोन-लॅपटाॅप जप्त

प्रवीण मुधोळकर, नागपूर,11 आॅक्टोबर : डीआरडीओ माहिती लिक प्रकरणी आरोपी निशांत अग्रवालच्या पत्नीचेही फोन आणि लॅपटाॅप जप्त करण्यात आले आहे. एटीएसने निशांतची पत्नी क्षितीजा अग्रवालचे फोन आणि लॅपटाॅप जप्त केले आहे.

डीआरडीओच्या नागपूर मधील ब्रम्होस प्रोजेक्टमधील माहिती पाकिस्तानच्या कुख्यात आयएसआय संघटनेला देणाऱ्या निशांत अग्रवालच्या पत्नीचेही फोन आणि लॅपटॉप एटीएसने ताब्यात घेतले आहे. निशांत आणि त्याची पत्नी क्षितीजा यांच्यात वाद होत होते. निशांत काहीतरी गडबड करतोय याचा पत्नीला संशय यायचा. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडत होते असं त्यांच्या घरमालकाने सांगितलं.त्यामुळे अधिक तपासासाठी एटीएसने निशांतच्या पत्नीचे फोन आणि लॅपटाॅपही जप्त केले. आयएसआयच्या एजंट्सनी निशांतच्या फेसबुकमध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्यानंतर त्य़ाची पत्नी क्षितीजाच्याही अकाऊंटमध्येही याच आयडी फ्रेंड असल्याचं तपासात पुढे आलंय.

क्षितीजा मुळची भोपाळची असून निशांतसोबत लग्ना होण्याआधी ती बंगळुरूमध्ये इंजिनिअर होती. आता या प्रकरणामध्ये निशांत गेल्या काही काळात ज्या ज्या देशात गेला त्या ठिकाणी कुणाकुणाच्या संपर्कात आला याचाही शोध सुरू आहे.

दरम्यान, डीआरड़ीओच्या ब्राम्होस प्रोजेक्टमधील महत्वाची माहिती ही पेन ड्राईव्हद्वारे निशांतने घरच्या कॅम्प्युटरमध्ये आणली असल्याची बाबसमोर आलीये. दरम्यान, आरोपी निशांतची पत्नी क्षितीजा वडिलांसोबत भोपाळला गेली.​

Loading...
Loading...

काय आहे प्रकरण ?

निशांत अग्रवालने भारताच्या सिकर या नवीन प्रणालीची माहिती पाकिस्तानला दिली असल्याचं सांगण्यात आलं आहे. आपली खरी ओळख लपवून तो काम करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सिकर ही अशी प्रणाली आहे की जी ब्राह्मोसची अचूक मारक क्षमता सांगू शकते.

सिकर प्रणाली याच वर्षी भारतात तयार करण्यात आली होती आणि याची माहिती फक्त रशियाशी शेअर केली होती. पण निशांतने या प्रणालीची माहिती पाकिस्तानलाही दिली. फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंडशिप रिक्वेस्ट तो स्वीकारायचा. इस्लामाबाद शहरातील आयपीवरून चालवणाऱ्या फेसबुक अकाउंट असलेल्या महिलेशी तो चॅट करायचा. त्या महिलेने निशांतचा लॅपटॉप हॅक करून संपूर्ण माहिती आपल्याकडे घेतली. निशांतने पाकिस्तानला पुरवलेली माहिती देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. निशांत अग्रवाल हा त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून 2 पाकिस्तानी महिलांशी बोलत होता. ‘नेहा शर्मा’ आणि ‘पूजा रंजन’ या नावाने चालणाऱ्या खोट्या अकाऊंटच्या मदतीने तो पाकिस्तानमध्ये माहिती पुरवत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 04:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close