S M L

LIVE : राज्यात गणेश विसर्जनादरम्यान 8 जण बुडाले

आज प्रत्येक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 5, 2017 09:03 PM IST

LIVE : राज्यात गणेश विसर्जनादरम्यान 8 जण बुडाले

Highlight

Sep 5, 2017

 • 20:57(IST)

  जळगाव- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे गणेश विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या संतोष धनगर २१ व योगेश धनगर २३ या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू.

 • 20:57(IST)

  जळगाव- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे गणेश विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या संतोष धनगर २१ व योगेश धनगर २३ या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू.

 • 20:44(IST)

                          लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक खडा पारसी जवळ पोहचली

 • 20:02(IST)

  पुणे- दगडूशेठ गणपतीचा रथ विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज...

 • 19:59(IST)

  पुणे- दगडूशेठ गणपतीचा रथ विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज...

 • 19:46(IST)

  पुण्यातील पाच मानाचे गणपती विसर्जित

  1. कसबा 2. तांबडी जोगेश्वरी, 3. गुरुजी तालीम, 4. तुळशीबाग. 5 केसरीवाडा गणपती. या पाचही गणपतींचं विसर्जन झालं

 • 19:46(IST)

  पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन

 • 19:45(IST)

  पुण्यातील पाच मानाचे गणपती विसर्जित

  1. कसबा 2. तांबडी जोगेश्वरी, 3. गुरुजी तालीम, 4. तुळशीबाग. 5 केसरीवाडा गणपती. या पाचही गणपतींचं विसर्जन झालं

 • 19:45(IST)

  ढोल ताशाच्या गजरात मंगेशकर कुटुंबियांनी बाप्पाला निरोप दिला

 • 19:45(IST)

  ढोल ताशाच्या गजरात मंगेशकर कुटुंबियांनी बाप्पाला निरोप दिला

 • 19:45(IST)

  ढोल ताशाच्या गजरात मंगेशकर कुटुंबियांनी बाप्पाला निरोप दिला

 • 19:40(IST)

  औरंगाबाद मध्ये गणेश विसर्जनात 4 था मृत्यू...दौलताबाद तलावात बुडून युवकाचा मृत्यू, आकाश साठे या 14 वर्षीय युवकाचा मृत्यू , गणेश विसर्जनाच्या वेळी झाला मृत्यू

 • 19:35(IST)

  पुणे - मुळा नदीत दोन जण बुडाली, गणपती विर्जन करण्यासाठी गेली असता दोघे बुडाले, बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू

 • 19:32(IST)

  पुण्यात मानाच्या 5 गणपतींपैकी 4 गणपतींचं विसर्जन

 • 19:15(IST)

  राज्यात गणेश विसर्जनादरम्यान नऊ जण बुडाले,पुण्यात दोन, पिंपरी चिंचवडमध्ये दोन औरंगाबादेत चार तर नाशकात एकाचा मृत्यू

05 सप्टेंबर: आज अनंत चतुर्दशी, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. गेले 10 दिवस बाप्पांचा सोहळा सुरू होता. त्यांचं कोडकौतुक केल्यानंतर, त्यांच्यासमोर मनोभावे प्रार्थना केल्यानंतर आज त्यांना निरोप दिला जाणार आहे.

आज प्रत्येक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. मोठमोठ्या मंडळाच्या विसर्जन मिरवणूकांसाठी त्या मंडळांना जय्यत तयारी आणि नियोजन केलं आहे.

सर्व गणेशभक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाची आज राजेशाही विसर्जन मिरवणुक निघाली आहे. सकाळी ९:३० च्या सुमारास राजाची उत्तरआरती झाली. त्यानंतर १०:३० च्या सुमारास लालबागच्या राजाची शाही विसर्जन मिरवणुक लालबाग मार्केटमधुन निघाली.

त्यानंतर राजाची मिरवणुक लालबाग ते भारतमाता सिनेमा परीसरातून जाणार आहे. आज सकाळी निघणारी राजाची विसर्जन मिरवणुक उद्या पहाटे गिरगाव चौपाटीवर पोहोचेल. त्यानंतर लालबागच्या राजाचं अरबी समुद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सह्यायाने कोळी बांधव विसर्जन करणार आहेत. यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी समुद्रात स्कूबा डायवर्सही तैनात असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 06:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close