नगरमधील घटना ऑनर किलिंग नाही? हे आहे धक्कादायक वास्तव

अहमदनगरमधील निघोज येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 11:27 PM IST

नगरमधील घटना ऑनर किलिंग नाही? हे आहे धक्कादायक वास्तव

अहमदनगर, 10 मे : अहमदनगरधील निघोज येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या प्रकरणात आता नवीन वळण लागलं आहे. 1 मे रोजी मंगेश आणि रुक्मिणी या दाम्पत्याला मुलीच्या घरच्यांनी जाळलं नसल्याचं निष्पन्न झालं आहे. तर, रुक्मिणी हिला पती मंगेश यानेच जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपचारादरम्यान रुक्मिणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आपला तपास अहवाल हा पारनेर कोर्टात सादर केला आहे. यामध्ये मंगेश रणशिंगनं बायको रुक्मिणीला जाळलं असल्याचं पोलीस तापसात निष्पन्न झालं आहे.


सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी सट्टा बाजारात बदलले अंदाज; भाजपला येणार अच्छे दिन?

काय होतं प्रकरण

अहमदनगरमध्ये सैराट चित्रपटातील घटनेची पुनरावृती झाल्याची घटना समोर आली होती. यामध्ये जिल्ह्यातील निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश रणसिंग हे 1 मे रोजी त्यांची पत्नी रुक्मिणीला भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेला होते. घरी गेल्यावर रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रूक्मिणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली. यावेळी रूक्मिणी मात्र, मंगेश बरोबर जाण्यास निघाली असता तिघांनी या पती-पत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले आणि घराला कूलूप लावून निघून गेले. मात्र, आरडाओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. उपचारदम्यान, रुक्मिणीचा मृत्यू झाला. मंगेश व रुक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तिचे वडील काका आणि मामा यांचा लग्नाला विरोध होता अशी माहिती समोर आली होती.

Loading...

पण, पोलिसांनी सादर केलेल्या अहवालामध्ये मात्र पती मंगेशनं रुक्मिणीला जाळल्याचं म्हटलं आहे. या साऱ्या प्रकरणामध्ये रुक्मिणीच्या भावाचा जबाब हा महत्त्वाचा होता.


SPECIAL REPORT: 'चालबाज' गंभीर, आपच्या आरोपानंतर अरुण जेटलींना चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 11:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...