महात्मा गांधींबद्दलचं ट्वीट IAS निधी चौधरींना भोवलं; मुख्यमंत्र्यांनी केली कारवाई

nidhi chaudhary controversial tweet about mahatma gandhi : महात्मा गांधींबद्दल IAS निधी चौधरी यांनी केलेलं ट्वीट त्यांना भोवलं आहे. त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत त्यांच्यावर कारवाई केली.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 04:26 PM IST

महात्मा गांधींबद्दलचं ट्वीट IAS निधी चौधरींना भोवलं; मुख्यमंत्र्यांनी केली कारवाई

मुंबई, विवेक कुलकर्णी 03 जून : IAS अधिकारी निधी चौधरी यांना केलेलं ट्वीट त्यांना भोवलं आहे. कारण, निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात बदली करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ‘न्यूज18 लोकमत’ला दिली. निधी चौधरी यांची मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. शिवाय, निधी चौधरी यांना राज्य सरकारनं कारणे दाखवा नोटीस देखील पाठवली आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. शिवाय, विरोधक देखील आक्रमक झाले होते. त्यानंतर त्यांची आता मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.

काय केलं होतं ट्वीट

17 मे रोजी "महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता वेळ आली आहे. ज्या रस्ते, संस्थांना गांधीचे नाव दिले आहे, ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत तसेच नोटेवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 30-1-1948 साठी थँक्यू गोडसे." असं निधी ट्वीट निधी चौधरी यांनी केली होतं.



Loading...

निधी चौधरी यांच्या या वादग्रस्त ट्वीटमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली.  त्यांनी आपलं ट्वीट डिलिट केलं.  त्यानंतर  पुन्हा एकदा त्यांनी गांधींजींच्या पुतळ्यासोबतचे फोटो ट्विटरवर शेअर करत, लोकांनी माझ्या ट्वीटचा विपर्यास केला त्यामुळे मी माझं ट्वीट डिलिट केल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. महात्मा गांधींचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता असंही त्यांनी आपल्या आत्ताच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.




अभिनेत्री पायल रोहतगीचे पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट..जितेंद्र आव्हाडांनी केला हा आरोप

शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, निधी चौधरी यांच्या वादग्रस्त ट्वीटनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.




विरोधकांनी देखील त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. वादग्रस्त ट्विट निधी चौधरी यांना भोवलं असून त्यांची बदली आता मंंत्रालयात करण्यात आली आहे.


VIDEO : विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींनी मिरवल्या तलवारी आणि एअर रायफल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...