मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 7 जण जागीच ठार

दोन कार समोरासमोर एकमेकांना धडकल्या. हा भीषण अपघात आज दुपारी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2018 05:47 PM IST

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 7 जण जागीच ठार

लोणावळा, 15 जुलै : मुंबई-पुणे महामार्गावर दोन कार समोरासमोर एकमेकांना धडकल्या. हा भीषण अपघात आज दुपारी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ झाला. पुण्यावरून येणारी कार भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ही कार डिव्हायडर तोडून बाजूच्या लेनवर धडकली आणि सॅण्ट्रो कारवर धडकल्याची माहिती पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात सात जण जागीट ठार झाले. हा अपघाच एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. स्विफ्ट कार पुण्याहून मुंबईकडे (एम एच 14 / सी एक्स 8339) येत होती तर सॅण्ट्रो (एम एच 12 / ई एक्स 1682)  मुंबईहून पुण्याकडे जात होती. या कार्समध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्यांचे शव कटरनं कापून बाहेर काढत आले. रात्रीपासून कोसळणारा पाऊस आणि निसरडे झालेले रस्ते त्यातच चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 जण पींपरी चिंचवडचे तर दोन जण शिवाजीनगरचे तरूण होते अशी माहिती आहे.जखमींना पुण्याच्या संजीवनी हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भर रस्त्यात अपघात झाल्याने दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शनिवार आणि रवीवारी पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रचंड गर्दी असते. लोणावळा आणि खंडाळ्याला येणाऱ्या पर्यंटकांची प्रचंड गर्दी असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नेहमीच करावा लागतो. त्यामुळं प्रशासनानं या रस्त्यावरच्या अनेक पर्यटन स्थळांवर बंदी घातली आहे. तरीही गर्दी होत आहे. चालकांनी वाहनं चावताना काळजी घ्यावी असं आवाहनही पोलीसांनी केलं आहे.

या पर्यटनस्थळांवर आहे बंदी

पावसाळ्यात होणारी पर्यटकांची गर्दी आणि धोका लक्षात घेऊन प्रशासनाने रायगड, कर्जत, खोपोलीतील तीन पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली आहे. 5 जुलै 2018 ते 4 सप्टेंबर 2018 कालावधीसाठी ही बंदी राहिल. कर्जतच्या उपविभागीय दंडाधिका-यांनी हे आदेश काढले आहेत.

या पर्यटन स्थळांवर आहे बंदी

Loading...

खालापूर - आडोशी धबधबा

खालापूर - आडोशी पाझर तलाव

खोपोली - झेनिथ धबधबा

या तीनही ठिकाणांवर सुट्ट्यांमध्ये पुण्या मुंबईच्या पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. वाहनांची गर्दी आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळं या ठिकाणांवर अनेक प्रश्न निर्माण होतात. वाहतूकीची कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना ही तिनही ठिकाणं धोक्याची केंद्र ठरली आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत आणि पर्यटक सूचनांचं पालन करत नाही त्यामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आल्याचं प्रशासनाने जाहीर केलं आहे.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...