'न्यूज 18' Exit Poll : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा पराभव होणार, काँग्रेसला धक्का?

'न्यूज 18' Exit Poll : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा पराभव होणार, काँग्रेसला धक्का?

नांदेडची जागा ही माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गड मानली जाते.

  • Share this:

मुंबई, 20 मे : लोकसभेचे निकाल काय लागतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे.  एक्झिट पोल चे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातलं सर्वांचं लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रसे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव होईल अशी शक्यता 'न्यूज 18' आणि IPSOSच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली. 23 मेरोजी लागणाऱ्या निकाल असं झालं तर तो काँग्रेसला मोठा धक्का असेल. 2014 च्या मोदी लाटेतही चव्हाण विजयी झाले होते.

नांदेडची जागा ही माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गड मानली जाते. त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे नांदेडमधून अनेक वेळा निवडून आले.

शिवसेनेने यावेळी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी दिली. इथे समाजवादी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याने ही लढत काहिशी बहुरंगी झाली पण मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होती.

राजकीय इतिहास

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी 1980 मध्ये इथे वर्चस्व मिळवलं. त्यानंतर त्यांनी 1984 च्या निवडणुकीतही विजय मिळवला. 1986 मध्ये जेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी नांदेडची जागा सोडली. 1987 मध्ये इथे पोटनिवडणूक झाली तेव्हा अशोक चव्हाण इथून निवडून आले.

लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत बापूराव खतगावकर यांचा विजय झाला. बापूराव खतगावकर हे शंकरराव चव्हाण यांचे जावई आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही अशोक चव्हाण यांनी नांदेडची जागा राखली. त्यावेळी काँग्रेसला नांदेड आणि कोल्हापूर या फक्त दोन जागा मिळाल्या.

सेनेकडून प्रताप चिखलीकर

प्रताप चिखलीकर यांनी शंकरराव चव्हाण यांच्याबरोबरच राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पण नंतर मात्र अशोक चव्हाणांशी मतभेद झाल्यामुळे ते विलासराव देशमुख यांच्या गोटात गेले. 2012 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि 2014 मध्ये ते शिवसेनेत गेले.

मुस्लीम आणि दलित मतं निर्णायक

नांदेडमधला सचखंड गुरुव्दारा शीखधर्मियांचं महत्त्वाचं केंद्र आहे. इथे मराठा आणि दलित मतदारांची मतं निर्णायक आहेत. शिवाय काँग्रेसचे परंपरागत मतदार असलेल्या मुस्लीम मतदारांवरही इथली राजकीय गणितं अवलंबून आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2019 07:18 PM IST

ताज्या बातम्या