पोखरणमध्ये युद्ध सराव सुरू...आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2019 06:30 AM IST

पोखरणमध्ये युद्ध सराव सुरू...आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

पोखरणमध्ये युद्ध सराव सुरू

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताकडून रणनीती आखली जात आहे. राजस्थानमधील पोखरणमध्ये काळजात धडकी भरवणारा युद्ध सराव सध्या सुरू आहे. काल वायू सेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. आजही या ठिकाणी युद्ध सराव सुरू राहणार आहे.

कलाकार वाहणार श्रद्धांजली

दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिनेमाच्या वतीनं पुलवामामधील शहिदांना श्रद्धांजलीचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला अनेक कलाकार दुपारी 12वाजता हजर राहणार आहे.

भाजपकडून मोर्चा

Loading...

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपकडून दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात अनेक भाजपचे कार्यकर्ते हजर राहणार आहे.

भाजप-सेनेच्या युतीचा निर्णय

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेच्या काही अटी मान्य केल्या आहेत. त्यानंतर आता युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. विधानसभेत50-50 तर लोकसभेत 25-23चा फॉर्म्युला असणार आहे. आज यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा

उरणमधील जेएनपीटी इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2019 06:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...