NEWS18 EXIT POLL 2019 : बारामतीत काँटे की टक्कर, येऊ शकतो धक्कादायक निकाल!

बारामती जिंकणारच अशी गर्जना करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच ताकद पणाला लावून दिली होती.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 07:19 PM IST

NEWS18 EXIT POLL 2019 : बारामतीत काँटे की टक्कर, येऊ शकतो धक्कादायक निकाल!

बारामती, 20 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार पुन्हा येणार असा कल देण्यात आला आहे. न्यूज 18 आणि IPSOS या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमध्ये बारामतीत काँटे की टक्कर पाहण्यास मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या तुल्यबळ लढत पाहण्यास मिळणार आहे.

बारामती जिंकणारच अशी गर्जना करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच ताकद पणाला लावून दिली होती. भाजपने सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून ते सर्वच प्रमुख नेत्यांनी प्रचार केला होता. बारामती जिंकणाराच अशी भीमगर्जना मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांचे स्वप्न भंगले आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे बारामती राखणार का ? त्यांचं मताधिक्य वाढणार की घटणार ? असे प्रश्न विचारले जात होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची माढामधून माघार, मावळमध्ये पार्थ पवारची उमेदवारी या दोन्ही कारणांमुळे बारामतीची लढतही नेहमीप्रमाणेच चांगलीच गाजली.

मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर कपबशीच्या चिन्हावर लढले तेव्हा सुप्रियाताईंना केवळ ६९ हजारांचं मताधिक्य होतं. यावेळी कांचन कुल कमळाच्या चिन्हावर लढत असल्याने सुप्रियाताईंसमोर मोठं आव्हान होतं.

Loading...

बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, भोर, इंदापूर, दौंड, खडकवासला आणि पुरंदर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांमध्ये ही लढत अत्यंत चुरशीची बनली होती.

अजित पवारांनी दिलं आव्हान

बारामतीची निवडणूक भाजपने जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मावळमध्ये जास्त ताकद लावली. त्यामुळे त्यांचं बारामतीकडे दुर्लक्ष होतंय का, असाही सवाल विचारला जात होता.

बारामती हा माझा मतदारसंघ आहे, तुम्ही इथे येताना विचार करा, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत 24 गावांच्या पाण्याचा प्रश्न गाजला होता. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या गावांना हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं.

दिग्गज नेत्यांच्या सभा

कांचन कुल यांच्या प्रचारासाठी खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये सभा घेतल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी खडकवासल्यामध्ये सभा घेतली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर बारामतीमध्ये भाड्याचं घर घेऊन दोन आठवडे मुक्काम ठोकला होता. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे हा प्रचार चांगलाच गाजला होता.

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...