S M L

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून, पंतप्रधान कृषी योजनेचे पाहिजे होते 6 हजार रुपये!

सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कृषी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक 6 हजार रूपये मिळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 05:38 PM IST

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून, पंतप्रधान कृषी योजनेचे पाहिजे होते 6 हजार रुपये!

हर्ष महाजन, प्रतिनिधी

नागपूर, 12 फेब्रुवारी : मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत पंतप्रधान कृषी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्याला 6 हजार रुपये मिळणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे.

सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कृषी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक 6 हजार रूपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी ग्रामपंचायत इथं 5 एकराच्या आत असलेल्या शेतकऱ्यांची यादी लावून शेतकऱ्यांकडून सातबारा आणि इतर कागद पत्रे मागविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी टेलकामठी येथील शेतकरी रमेश वाडीकर आणि गणेश वाडीकर हे दोघे भाऊ पात्र ठरले. त्यांच्याकडे कौटुंबिक चार एकर शेती आहे.


जमीन क्षेत्र एकर असल्यानं दोघा भावांचा सातबारा वेगळा नाही. त्यामुळे कुणाही एका भावाला या योजनेचा लाभ मिळणार होता. यासाठी दोघाही भावांनी स्वतःचे बँक पासबुक खात्याची प्रत ग्रामपंचयात कार्यालयात शनिवारी जमा केली.

मात्र, योजनेचा लाभ मीच घेणार यावरून दोघांचे भांडण झाले. वाद तिथेच न थांबता, सायंकाळी पुन्हा दोघा भावांचे शेतात भांडण झाले. राग अनावर झाल्यानं लहान भाऊ गणेश संतोष वाडीकर याने मोठा भाऊ रमेश संतोष वाडीकर याच्या डोक्यावर दगडानं प्रहार केला. यात तो गंभीर जखमी झाला. गावकऱ्यांनी बेशुद्ध झालेल्या गणेशला बेशुद्ध अवस्थेत सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी दरम्यान मृत घोषित केलं.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading...

राज्यात पहिली अंमलबजावणी

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून सुरू झाली आहे. राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जमवलेला डाटा वापरून दोन हप्ते म्हणजेच चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या ख्यात्यात जमा होणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने शासकीय यंत्रणेला कामाला लावले असून, जिल्ह्णातील प्रत्येक खातेधारक शेतकऱ्यांची गावपातळीवर माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.

अशी आहे योजना

-ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आनलाईन माहिती भरली त्यांच्या खात्यात लवकरच पैसै जमा होणार

-केंद्र सरकार राज्य सरकारला पैसै देणार राज्य सरकार ते पैसै शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

-हे पैसे शासकीय बँका शेतकऱ्यांच्या खात्यातून कापू शकणार नाही

-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या आधारावरच राबविली जाणार योजना

-कारण कर्जमाफी योजनेमुळे आधीच बहुतेक शेतकऱ्यांची आनलाईन माहिती सरकारकडे, त्यामुळे राज्याच्या शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागणार नाही

-ज्या राज्यांत शेतकऱ्यांच्या याद्या डिजिटल नाही तिथे वेळ लागण्याची शक्यता

=================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 05:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close