निगडीत कर्मचाऱ्यांवर हल्ला करून ४८ लाखांची रोकड लुटली

चोरटे दोन दुचाकीवरून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 3, 2018 05:36 PM IST

निगडीत कर्मचाऱ्यांवर हल्ला करून ४८ लाखांची रोकड लुटली

पिंपरी-चिंचवड, 03 मे : यमुनानगर निगडीत अज्ञात चोरट्यांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला करून 48 लाखांची रोकड लुटल्याची घटना घडलीय. ही घटना गुरुवारी दुपारी यमुनानगर निगडी येथे घडली.

आकुर्डीमधील एलआयसी तसंच इतर बँकेची रोकड घेऊन चाललेल्या चेकमेट या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर वार करुन चौघांनी अंदाजे ४८ लाख रुपयांची रोकड लुटून नेली. चोरटे दोन दुचाकीवरून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2018 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...