S M L

न्यूज18 लोकमतचा दणका, कंत्राटदाराच्या पैशांवर थायलंडवारी करणारे 11 कर्मचारी निलंबित

नागपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील 22 कर्मचारी नातेवाईकांच्या लग्नासाठी सुट्टया घेऊन थायलंडमध्ये कंत्राटदाराच्या पैशावर मौजमजा करण्यासाठी गेले होते.

Sachin Salve | Updated On: May 16, 2018 10:55 PM IST

न्यूज18 लोकमतचा दणका, कंत्राटदाराच्या पैशांवर थायलंडवारी करणारे 11 कर्मचारी निलंबित

नागपूर, 16 मे : विनापरवानगी कंत्राटदाराच्या पैशावर थायलंडच्या वारीवर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या अकरा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय.

नागपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील 22 कर्मचारी नातेवाईकांच्या लग्नासाठी सुट्टया घेऊन थायलंडमध्ये कंत्राटदाराच्या पैशावर मौजमजा करण्यासाठी गेले होते. सर्वसामान्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या कंत्राटदारांच्या पैशावर मौजमजा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा प्रताप न्यूज 18 लोकमतनं चहाट्यावर आणला होता.

आता यातील 10 कर्मचाऱ्यांना पदावरून निलंबित करण्यात आलंय. पण या दौऱ्याचे आयोजन करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होऊ लागली आहे.

यामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोन शिपायांसह मुख्य आरेखक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अधीक्षक, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, आरेखक यांच्यासह रामटेक आणि मौदा उपविभागाचे दोन शाखा अभियंता तसंच सावनेर पंचायत समितीतील एका शाखा अभियंत्याचा समावेश आहे. पण या दौऱ्याचे आयोजन करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होऊ लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 10:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close