न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : विठ्ठल दर्शनासाठी दलाली, ७ जणांवर होणार कारवाई

पंढरपूरच्या विठ्ठल मंदीरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दलाली घेतली जात असल्याचं प्रकरण न्यूज १८ लोकमतने उघड केलं होतं. या प्रकरणात आता ७ कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 16, 2018 09:44 AM IST

न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : विठ्ठल दर्शनासाठी दलाली, ७ जणांवर होणार कारवाई

16 एप्रिल : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दलाली घेतली जात असल्याचं प्रकरण न्यूज १८ लोकमतने उघड केलं होतं. या प्रकरणात आता ७ कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. गेल्या २६ मार्चला, न्यूज १८ लोकमतने श्री विठ्ठल मंदिरातील शॉर्टकट दर्शनाच्या दलालीचा भांडाफोड केला होता. न्यूज १८ लोकमतने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनची राज्यभर चर्चा झाली होती.

देवाच्या दारात बोकाळलेला शॉर्टकट दर्शनाचा बाजार बंद झालाच पाहिजे आणि या दलालांना पाठीशी घालणाऱ्या मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वारकरी भाविकांमधून होती होती. याबातमीची तत्परतेने दखल घेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी हे प्रकरण चौकशीसाठी पोलिसांकडे सुपूर्त केले होतं.

या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास केला असून दलालीच्या रॅकेटमध्ये सहभाग असणाऱ्या मंदिर समितीच्या सात कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव मंदिर व्यवस्थापनाकडे पाठविला आहे. दरम्यान, कारवाई होईपर्यंत न्यूज १८ लोकमत या बातमीचा पाठपुरावा करीत राहणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close