S M L

शनिवार ठरला अपघात वार, राज्यात वेगवेगळ्या घटनेत 15 ठार

संक्रांतीच्या आधीचा शनिवार अनेकांसाठी घातवार ठरला आहे. आजच्या दिवशी राज्यात 3 वेगवेगळ्या दुर्घटनांत मनुष्यहानी झालीये.

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2018 04:42 PM IST

शनिवार ठरला अपघात वार, राज्यात वेगवेगळ्या घटनेत 15 ठार

13 जानेवारी : संक्रांतीच्या आधीचा शनिवार अनेकांसाठी घातवार ठरला आहे. आजच्या दिवशी राज्यात 3 वेगवेगळ्या दुर्घटनांत मनुष्यहानी झालीये. या तीन वेगवेगळ्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय.

सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच पैलवानांसह गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना हा अपघात घडला. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास सांगलीतील कुंडल गावातल्या क्रांती कुस्ती संकुलाचे काही पैलवान प्रवास करत होते. साताऱ्यातील औंधमध्ये कुस्ती खेळून ते क्रूझरने परतत होते. शिरगाव फाट्याजवळ उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन भीषण अपघात झाला. त्यानंतर चिंचणी वांगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं.  पैलवान आकाश देसाई, पैलवान विजय पाटील, पैलवान सौरभ माने, पैलवान शुभम घारगे यांचा मृत्यू झाला.

डहाणूत बोट उलटून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

तर डहाणू किनारपट्टीवर 2 दुर्घटना घडल्या. एका दुर्घटनेत शाळकरी मुलांना घेऊन निघालेली बोट उलटली. सुदैवानं यात 32 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं, मात्र 2 जणांचा बुडून मृत्यू झाला. तर 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. हे सर्व विद्यार्थी के. एल. पोंदा हायस्कूलचे आहेत.

 ओएनजीसीचं हेलिकाॅप्टर समुद्रात कोसळलं, 7 जण ठार ?

दिवसभरातल्या तिसऱ्या घटनेत ओएनजीसीच्या पाच उपमहाव्यवस्थापकांना तेलाच्या खाणीवर वाहून नेणारं हेलिकॉप्टर डहाणू किनारपट्टीपासून 40 किलोमीटर आत समुद्रात कोसळलं. या हेलिकॉप्टरमधील 2 पायलटसह पाचही प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी दुर्घटनेबाबत चौकशीचे आदेश दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close