गर्भवती असताना सासरच्यांनी पोटावर मारल्या लाथा, सुसाईड नोट लिहून तरुणीची आत्महत्या

गर्भवती असताना सासरच्यांनी पोटावर मारल्या लाथा, सुसाईड नोट लिहून तरुणीची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एका नवविवाहितेनं आपल्या आयुष्य संपवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:

बीड, 23 जुलै : सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एका नवविवाहितेनं आपल्या आयुष्य संपवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दिपाली रोहित शितोळे (वय 23 वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे. दिपालीनं सोमवारी (23 जुलै)  माहेरी गळफास घेऊन आपलं आपली जीवनयात्रा संपवली. बीडमधील अजीजपुरा भागातील शिराळे गल्लीतील ही घटना आहे. घटनास्थळावरून पोलिसांना दिपालीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीदेखील सापडली. यामुळे तपासाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे. या चिठ्ठीतील धक्कादायक माहिती समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप दिपालीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

(पाहा :VIDEO: 5 सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली 5 मजली इमारत)

नेमके काय आहे प्रकरण?

दिपालीचा रोहित शिराळेसोबत 26 एप्रिल 2019 रोजी विवाह झाला होता. मात्र त्यांच्या सुखी संसाराला संशयाचे ग्रहण लागलं. लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच दिपालीच्या चारित्र्यावर संशय घेत सासू, सासरा, नवरा तिला मानसिक तसंच शारीरिक त्रास देऊ लागले. ही बाब खुद्द दिपालीने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिली आहे.

(पाहा : VIDEO: तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचवले प्राण)

चिठ्ठीत दिपालीने जिल्हाअधिकारी यांच्याकडे अर्ज करत पुढील प्रमाणेमजकूर लिहिलेला आहे.

'माझा नवरा, सासू, सासऱ्यांनी लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माझा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, मी  सहा आठवड्यांची गर्भवती असताना माझ्या पोटावर लाथा मारून  मला घरातून बाहेर काढले. मला बळजबरीनं गर्भपात करायला लावले. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना लग्न थाटात केलं. पण या सर्वांनी माझ्यावर संशय घेत छळ केला. ते माझी  हत्या करून या घटनेस आत्महत्या असल्याचं दाखवू शकतात. मला या त्रासातून मुक्त करा', अशी माहिती दिपालीनं चिठ्ठीत लिहिली आहे.

(पाहा :VIDEO: चंद्रकांत पाटलांनी 'हा' बालिशपणा सोडून द्यावा; धनंजय मुंडेंचा टोला)

माहेरी सापडलेली ही चिठ्ठी 9 जून 2019ला लिहिलेली आहे. या चिठ्ठीसंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

VIDEO: कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी पूर्ण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2019 01:55 PM IST

ताज्या बातम्या