S M L

नवविवाहितेनंच केला पतीचा खून, काय आहे रहस्य?

महाबळेश्वरला आपल्या पत्नीसह फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाला. या खुनाचा उलगडा सातारा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात लावला असून या तरुणाचा खून पत्नीनेच केल्याचं उघड झालं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 4, 2018 12:05 PM IST

नवविवाहितेनंच केला पतीचा खून, काय आहे रहस्य?

तुषार तापसे, सातारा, 04 जून : महाबळेश्वरला आपल्या पत्नीसह फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाला. या खुनाचा उलगडा सातारा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात लावला असून या तरुणाचा खून पत्नीनेच केल्याचं उघड झालं. काय आहे या खुनाचं रहस्य आणि आणि नवविवाहितेने आपल्या पतीचा का खून केला?

ही आहे दीक्षा कांबळे. अतिशय सुंदर, नटखट अशी आनंदी वाटणारी नववधू. आनंद कांबळे नावाच्या आयुष्यात नवे रंग भरण्यासाठी तिने सात जन्माच्या गाठी बांधल्या. पण काही क्षणातच दीक्षाचं खरं रूप समोर आलं आणि आनंदच्या आयुष्यात जीवनसाथी बनून आलेली ही दीक्षा काही क्षणातच व्हिलन ठरली.

झालं असं की 20 मे रोजी यांचं लग्न झालं आणि हनिमूनसाठी ही नवविवाहीत जोडपं महाबळेश्वरला फिरायला आले आणि तिथं विश्वास बसणार नाही अशी धक्कादायक घटना घडली. दीक्षा आणि आनंदवर साताराजवळील पसरणी घाटात अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात आनंद याचा मृत्यू झाला तर दीक्षा जखमी झाली. प्रथमदर्शी या जोडप्यावर लुटमारीमुळे हल्ला झाल्याचं दिसून आलं. मात्र पोलिसांना तिथे काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आला आणि मग तपास सुरू झाला.

दीक्षाचे पुणे येथील नितीन मळेकर या युवकासोबत प्रेमसंबध होते. लग्नाला घरातील लोकांकडून विरोध असल्यामुळे तिने घरातील लोकांच्या मर्जीने नातेसंबंधातील आनंदशी लग्न केलं. मात्र तिच्या मनात काही तरी वेगळंच शिजत होतं. निखीलशी ती सतत फोनवर संपर्कात होती. दीक्षा आणि निखिल यांनी दोन व्यक्तींना सुपारी देऊन आनंदचा काटा काढण्याचा डाव रचला.

सगळ्या तपासानंतर पोलिसांनी निखिल मळेकरला चिंचवडमधून ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केलं आहे. पण या सगळ्या प्रकारात आनंदाचा मात्र हकनाक बळी गेलाय. गुन्हा कधीही लपत नाही आणि गुन्हेगारही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2018 12:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close