माता न तू वैरिणी.. नवजात अर्भक शेताच्या बांधावर फेकले

काठापुर-शिंगवे (पारगाव) रस्त्यांच्या कडेला शेताच्या बांधावर हे नुकतेच जन्मलेले हे अर्भक गुलाबी कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आले होते.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 05:48 PM IST

माता न तू वैरिणी.. नवजात अर्भक शेताच्या बांधावर फेकले

रायचंद शिंदे, (प्रतिनिधी)

शिरूर, 19 जुलै- तालुक्यातील काठापूर येथे रस्त्यांच्या कडेला स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले आहे. गावकऱ्यांनी तत्काळ दवाखाण्यात दाखल केल्याने मुलीचे प्राण थोडक्यात बचावले आहे. काठापुर-शिंगवे (पारगाव) रस्त्यांच्या कडेला शेताच्या बांधावर हे नुकतेच जन्मलेले हे अर्भक गुलाबी कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आले होते.

यशवंत केदारी व सुशिलाबाई झिंग्रे हे शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांना हे अर्भक दिसले. त्यांनी याबाबत सरपंच बिपीन थिटे यांच्यासह विकास दाते, संभाजी लोंढे, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अर्भकाला टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी कृष्णा चव्हाण व सेविका मंगल मेचे घोडे यांनी मुलीची तपासणी केली.

मुलीची तब्येत चांगली असून, तिचा जन्म पहाटेच्या सुमारास झाला असण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला. पोलिस नाईक संजय जाधव, अजित पवार यांनी तत्काळ मुलीला ताब्यात घेतले. तिला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अर्भकाला बेवारस टाकून दिल्याप्रकरणी अज्ञात आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बागायती भागातीस ही दुदैवी घटना आहे. टाकळी हाजी बेट भागासह काठापूर हे समृद्ध गाव आहे. या भागात मुलगी झाली म्हणून रस्त्यावर टाकून देण्याची घटना प्रथमच घडली आहे. हे अत्यंत दुर्देव असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता गावडे यांनी दिली आहे.

Loading...

असे केले आवाहन..

ज्यांना मुलगी नकोशी झाली आहे अशा मुलींच्या शिक्षणासह लग्नापर्यंतचा खर्च मी स्वतः करते, पण मुलीला असे रस्त्यावर टाकू नका, असे आवाहन सुनीता गावडे यांनी केले आहे.

पाणी मागताच ग्रामसेवकानं दाखवलं पिस्तूल; VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...