देहुरोड कॅन्टोन्मेंट कचरा गाडीत आढळले मृत अर्भक, दीड महिन्यातील तिसरी घटना

देहुरोड कॅन्टोन्मेंट कचरा गाडीत आढळले मृत अर्भक, दीड महिन्यातील तिसरी घटना

देहुरोड कॅन्टोन्मेंट कचरा गाडीत मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत अर्भक आढळल्याची दीड महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

  • Share this:

अनिस शेख, (प्रतिनिधी)

देहुरोड, 27 जून- देहुरोड कॅन्टोन्मेंट कचरा गाडीत मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत अर्भक आढळल्याची दीड महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीत गुरूवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कचरा जमा करणारा कर्मचारी संदीप दनाणे यांना कचऱ्यात मृत अर्भक आढळून आले. त्यांनी तात्काळ याबाबत ही माहिती स्थानिक पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरु केली.

कचरा जीवनरेखा हॉस्पिटलचा..

गाडीत टाकण्यात आलेला कचरा जीवनरेखा हॉस्पिटलचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयातील डॉ.यामिनी अडबे यांच्या मदतीने रुग्णालयातील कागदपत्रे तपासले असता कचरा गाडी टाकण्यात आलेला अर्भक जीवनरेखा हॉस्पिटलमधील असल्याचे सिद्ध झाले आहे. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. कचरा गाडीत अर्भक टाकण्यात आल्याची माहिती कर्मचार्‍यांनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान पोलिसांनी रुग्णालयातील कागदपत्र तसेच मृत अर्भक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मागील दीड महिन्याभरातील ही तिसरी घटना असल्याने देहुरोड शहरात एकच खळबळ उडाली आहे. याआधी गांधीनगर भागात गटारी मध्ये तसेच सार्वजनिक शौचालयात अर्भक आढळून आले होते. एकूणच या अर्भक आढळण्याच्या घटनेने देहुरोड परिसर हादरला आहे.

स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक सापडले...

देहुरोड शहरातील गांधीनगर येथील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात 17 जून पहाटे स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक सापडले होते. स्त्री जातीच्या मृत नवजात अर्भकाची पूर्ण वाढ झालेली होती. मागील महिन्यातही याच भागात नाल्यामध्ये मृत नवजात अर्भक आढळून आले होते. त्यामुळे स्थानिक नागरीकांत संताप व्यक्त केला जात आहे. देहुरोड पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेतले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

VIDEO: अमानुषतेचा कळस! अर्धनग्न करत तरुणाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 03:19 PM IST

ताज्या बातम्या