News18 Lokmat

थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनचा नवा ट्रेंड, मंदिरांमध्येही होतेय गर्दी

शिर्डीत 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2018 10:31 PM IST

थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनचा नवा ट्रेंड, मंदिरांमध्येही होतेय गर्दी

शिर्डी 30 डिसेंबर : नवीन वर्षांचं स्वागत म्हणजे नाच, गाणी, खाणं आणि पीणं हे समिकरण ठरलेलं आहे. वर्षाच्या शेवटी बेधुंद होऊन जायचं आणि सगळा शीण विसरायचा अशी पद्धत रूढ झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून तिर्थस्थानांवरही 31 डिसेंबरच्या रात्री गर्दी होते. शिर्डी, शेगाव, सिद्धीविनायक, तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर अशा ठिकाणीही प्रचंड गर्दी होत आहे. वर्ष संपताना आपल्या इष्ट देवतेचं दर्शन घ्यायचं आणि देवाच्या गाभाऱ्यात बसून नवीन वर्षाचं स्वागत करायचं असा हा ट्रेंड आहे.


गोव्या आणि कोकणातील हॉटेल्स फुल्ल


थर्टीफर्स्टच्या  सेलिब्रेशनसाठी हजारो पर्यटक गोवा आणि कोकणात दाखल झाले आहेत. पर्यटकांमुळे सर्व हॉटेल्स आणि समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेलेत. धम्माल, मस्ती, गाणी धुंद करणारी पेयं यांची सगळीकडेच रेलचेल असून पर्यटकांचे आगमन अजुनही सुरूच आहे.

Loading...


नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यापासून कोकणापर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी आतापासूनचं गर्दी केलीय. गेल्या काही वर्षात कोकणात नववर्ष साजरं करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढलीय. महाबळेश्वर आणि माथेरान या थंड हवेच्या ठिकणीही मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. मुंबईतही नववर्षाच्या स्वागतासाठीचा जल्लोष सुरू झालाय.


नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीही सज्ज झाली आहे. रविवार असल्याने शिर्डीत  भक्तांची प्रचंड गर्दी आहे. तर 31 डिसेंबरला मंदिरही रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. साईसंस्थानकडून भक्त निवासांमध्ये राहण्याची व्यवस्था, प्रसादालयात भोजनाची व्यवस्था आणि परिसरात सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आलीये. तर भक्तांनी इथली हॉटेल्सही हाऊसफूल झाली आहेत.
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2018 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...