S M L

लोकसभा 2019: गडकरी, दानवेंसह महाराष्ट्रातले हे उमेदवार झाले फायनल

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 09:22 PM IST

लोकसभा 2019: गडकरी, दानवेंसह महाराष्ट्रातले हे उमेदवार झाले फायनल

नवी दिल्ली, 21 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या उमेदवारांचा समावेश आहे. लोकसभेसाठी भाजपच्या आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज भाजपने राज्यातील 16 जणांची यादी जाहीर केली आहे. यात अपेक्षित प्रमाणे नागपूरमधून नितीन गडकरी तर जालन्यातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

असे आहेत महाराष्ट्रातील उमेदवार

नागपूर - नितीन गडकरी


धुळे- सुभाष भामरे

वर्धा - रामदास तडस

नंदुरबार - हीना गावित

Loading...

रावेर - रक्षा खडसे

अकोला - संजय धोत्रे

गडचिरोली - अशोक महादेवराव नेते

चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहिर

जालना - रावसाहेब दानवे

भिवंडी - कपिल पाटील

मुंबई उत्तर - गोपाल शेट्टी

उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन

अहमदनगर - सुजय विखे पाटील

बीड - डाॅ. प्रीतम मुंडे

लातूर - सुधाकरराव भालेराव-शृंगारे

सांगली - संजयकाका पाटील

हे देखील वाचा: भाजपची पहिली यादी जाहीर; PM मोदी वाराणसीतून, अडवाणींचा पत्ता कट

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.


11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-


वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम


18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-


बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर


23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान


जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले


29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान


नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी


लोकसभा निवडणूक 2014


महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.


महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल


एकूण जागा 48


भाजप 23


सेना 18


राष्ट्रवादी काँग्रेस 4


काँग्रेस 2


स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1


VIDEO : 'खासदार व्हायचं म्हणून जमीन विकली'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 07:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close