राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोसळणार? 15 ऑगस्टपूर्वी होणार मोठी राजकीय घडामोड

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 10:55 AM IST

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोसळणार? 15 ऑगस्टपूर्वी होणार मोठी राजकीय घडामोड

नवी मुंबई, 19 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता नवीन मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. या  नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा एक गट भाजप प्रवेशासाठी बैठकांवर बैठका घेत आहे. शिवाय, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा हा गट 15 ऑगस्टपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचंही म्हटलं जात आहे.

(पाहा :दारूची अवैध वाहतूक करणारे 7 जण ताब्यात, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी)

महत्त्वाचं म्हणजे मार्च 2020मध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(पाहा :SPECIAL REPORT: फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?)

13 नगरसेवक आणि पदाधिकारी निर्णयावर ठाम

Loading...

2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजी मंत्री गणेश नाईक यांना सांगितले होतं की आपण पक्ष बदल करूयात मात्र त्यांनी राष्ट्रवादी सोडण्यास नकार दिला होता. यामुळे 2015च्या महापालिका निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करत काही नगरसेवक शिवसेनेत गेल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 16 वरून 32 वर पोहोचली. राष्ट्रवादीला सत्ता मिळाली मात्र संख्या घटली. यानंतर मागील महापौर निवडणुकीत या फुटीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीला महापौर बसवताना मोठी कसरत करावी लागली होती. आता मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करायचाच, असा ठाम निर्णय नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जर या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या आयुष्यातील ही शेवटची विधानसभा निवडणूक धोक्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. एवढंच नव्हे येणाऱ्या महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव सत्ता असलेली महापालिका ही भाजपकडे जाऊ शकते. यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.

(वाचा : सांगोलामध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार, 'या' युवानेत्यानं केला भाजप प्रवेश)

दरम्यान, सांगोलामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. कारण सांगोला तालुक्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 'माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला तालुक्यातील लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असताना भविष्यात प्रादेशिक पक्षात न राहता तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत', अशी प्रतिक्रिया चेतनसिंह केदार यांनी यावेळी दिली.माजी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले चेतनसिंह केदार भाजपवासी झाल्यानं सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठं नुकसान झालं आहे.दरम्यान, केंदार यांचा भाजपप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच महागात पडणार असल्याचं दिसत आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना हा मोठा हादरा असल्याचे मानले जात आहे.

चंद्रकांत पाटील यांचा दावा

'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामा देतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील,' असा दावा महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यामुळे आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे. ते राजीनामा देवून हातपाय गाळत आहेत. त्यामुळे त्यांचे आमदारही आता राजीनामा देतील. निवडणुकीला सहा किंवा त्यापेक्षा जास्त महिने बाकी असताना राजीनामा दिला तर पोटनिवडणूक होते. पण आता तर निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या आठवड्याभरात अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील,' असा दावा चंद्रकात पाटील यांनी केला आहे.

SPECIAL REPORT: युतीच्या वाटेवर कोण? आघाडीसाठी धोक्याची घंटा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 10:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...