भगवान गडावरचा वाद विकोपाला, पंकजा समर्थकांकडून 'सुपारी'ची भाषा

भगवान गडावरचा वाद विकोपाला, पंकजा समर्थकांकडून 'सुपारी'ची भाषा

भगवानगडावर होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत सोमनाथ खेडकर यांनी नामदेव शास्त्रींची सुपारी देण्याची भाषा केली.

  • Share this:

19 सप्टेंबर : भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याचा वाद आणखीनच चिघळलाय. पंकजा मुंडे समर्थक कार्यकर्त्यानं नामदेवशास्त्रींच्या हत्येची सुपारी देण्याची भाषा करून वाद निर्माण केलाय. भगवानगडावर होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत सोमनाथ खेडकर यांनी नामदेव शास्त्रींची सुपारी देण्याची भाषा केली.

खेडकर हे भाजपचे नेते आहेत. शिवाय ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्यही आहेत. एका राजकीय पक्षाच्या नेत्याला गुंडगिरीची भाषा शोभतेय का असा सवाल उपस्थित केला जातोय.

पंकजा मुंडे यांचं भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यात भाषण होणारच असा निर्धार पंकजा मुंडे समर्थकांनी केलाय. दसऱ्याच्या मेळाव्याच्या नियोजनासाठी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत पंकजा मुंडेंचं भगवानगडावर भाषण होणारच असा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. तर दुसरीकडं पंकजा यांच्या भाषणाला मंहत नामदेव शास्त्रींचा विरोध कायम आहे. मेळाव्यात राजकीय भाषण नको अशी त्यांची भूमिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 12:37 PM IST

ताज्या बातम्या