'जगबुडी'वरचा नवीन पूल वाहतुकीपूर्वीच खचला, अधिकाऱ्यांना चक्क पुलाला बांधले

कोकणात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरचा नवीन पूल वाहतुकीपूर्वीच खचल्याने प्रशासनाच्या निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 10:09 PM IST

'जगबुडी'वरचा नवीन पूल वाहतुकीपूर्वीच खचला, अधिकाऱ्यांना चक्क पुलाला बांधले

रत्नागिरी, 29 जून- कोकणात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरचा नवीन पूल वाहतुकीपूर्वीच खचल्याने प्रशासनाने केलेल्या निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे. पुलाची अवस्था पाहून मनसेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे आणि उपअभियंता प्रकाश गायकवाड या दोन अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत पुलाच्या रेलिंगला बांधून ठेवले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टाळला.

जगबुडी नदीवरचा नवीन पूल वाहतुकीपूर्वीच खचला. जोड रस्त्याला मोठी भगदाडं पडली आहेत. पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील गेले तडेही गेले आहेत. यंदाच हा पूल वाहतुकीसाठी सुरू होणार होता. मात्र पहिल्या पावसातच पुलाची दुर्दशा झाली आहे. यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. नवीन पूल सकाळी खचल्यानंतर दिवसभर अधिकारी न आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.

महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्ठळी येताच संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि त्यांना चक्क पुलाला बांधले होते.

आमदार संजय कदम , नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महामार्गावर भरणेनाक्यावर चक्का जाम आंदोलन केले. जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या जोड रस्त्याला भगदाड पडल्याने तसेच तो खचल्याने व पुलाच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याने मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. मात्र सकाळपासून एकही अधिकारी न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुलाचे काम नित्कृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप आमदार कदम यांनी केला आहे. ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत असल्याने पुलाची ही अवस्था झाली आहे. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी आणि मनसेने केली आहे.

स्कार्पिओ वाहून गेली...

Loading...

दुसऱ्या एका घटनेत नदीला स्कार्पिओ गाडी वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. पनवेसमधील देवत गावाजवळ गाढी नदीच्या पात्रातून  स्कार्पिओ गाडी पलीकडच्या काठावर जात असताना नदीच्या प्रवाहात वाहून गेली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यावेळी गाडीत ड्रायव्हरही होता. अचानक नदीचे पाणी वाढल्याने गाडी वाहून गेली. गावकऱ्यांनी अथक प्रयत्न करून प्रथम गाडीतून चालकाला बाहेर काढले. नंतर जेसीबीच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली.

वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2019 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...