नेवाळीत आंदोलनाला यश, नेव्हीच्या संरक्षक भिंतीच्या कामाला स्थगिती

नेवाळीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर नेव्हीच्या संरक्षक भिंतीच्या कामाला संरक्षणराज्यमंत्री सुभाष भामरे यांनी स्थगिती दिलीये.

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2017 11:03 PM IST

नेवाळीत आंदोलनाला यश, नेव्हीच्या संरक्षक भिंतीच्या कामाला स्थगिती

22 जून : नेवाळीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर नेव्हीच्या संरक्षक भिंतीच्या कामाला संरक्षणराज्यमंत्री सुभाष भामरे यांनी स्थगिती दिलीये. 29 जूनला शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावल्याची माहितीही भामरे यांनी दिलीये.

कल्याण जवळ झालेल्या शेतकरी आंदोलनंतर या प्रकरणी 29 जून रोजी विस्तारीत आढावा बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, नौदलाचे अधिकारी तसंच राज्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.

या बैठकीत महसूल कागदपत्रांसह जमिनीचे सर्व पुरावे नव्याने तपासले जाणार असून बैठक होईपर्यंत नौदलाला तात्पुरते काम थांबवन्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं यावेळी संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे म्हणाले.

कल्याण जवळील नेवाळी येथे संरक्षण विभागाची 1659 एकर जमीन असून त्यापैकी 400 एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. नेवाळी येथील शेतजमिनीच्या वादावरून कल्याणजवळ शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन छेडलं होतं.

दरम्यान, देशाची सुरक्षा जास्त महत्वाची असून त्या दृष्टीने पश्चिम सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नौदलासाठी हि जमीन महत्वाची आहे. जमिनीच्या वादाबाबत ही विस्तारीत बैठक बोलावण्यात आली असून बैठकित कागदपत्रांच्या आधारे जे समोर येईल ते सर्वांनी मान्य करावं असंही सुभाष भामरे यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 11:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close