निता अंबानी पुन्हा एकदा साईदरबारी..मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी घातलं साकडं

साईबाबांच्या भक्त असलेल्या निता अंबानी यांनी आज (गुरुवारी) पुन्हा साईदरबारी हजेरी लावली. साईसमाधीवर निळी शाल चढवत मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी त्यांनी साईबाबांना साकडं घातलं.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 03:47 PM IST

निता अंबानी पुन्हा एकदा साईदरबारी..मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी घातलं साकडं

हरीश दिमोटे (प्रतिनिधी)

शिर्डी, 2 मे- साईबाबांच्या भक्त असलेल्या निता अंबानी यांनी आज (गुरुवारी) पुन्हा साईदरबारी हजेरी लावली. साईसमाधीवर निळी शाल चढवत मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी त्यांनी साईबाबांना साकडं घातलं. निता अंबानी या IPL मधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीन आहेत. मुंबई इंडियन्सविरुध्द हैद्राबाद सामना आज होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी निता अंबानी यांनी साईमंदिरात पूजा केली. आजही दुपारच्या माध्यान्ह आरतीला निता अंबानी यांनी हजेरी लावत टीमच्या यशासाठी साईबाबांकडे साकडं घातलं आहे.

दरम्यान, गेल्यावेळी मुंबई इंडियन्सचा सामना सुरू होता त्यावेळी निता अंबानी साईमंदिरात हजर होत्या. मुंबई इंडियन्सचा सामना संपेपर्यंत त्या साईमंदिर परिसरातच थांबून होत्या. संघाच्या विजयाची बातमी आल्यानंतर निता यांनी साईबाबांचे दर्शन करून त्या माघारी फिरल्या होत्या.

मुंबई इंडियन्स जिंकावा म्हणून नीता अंबानी या साईमंदिरात ठाण मांडून होत्या. रात्रीच्या शेजारतीलाही नीता अंबानी उपस्थित होत्या.

टीमच्या विजयाचा निरोप येताच पुन्हा घेतले साईबाबांचे मुखदर्शन

Loading...

नीता यांनी साईसमाधीवर मुंबई इंडियन्सचा रंग असलेली निळी शाल चढवली. मुंबई इंडियन्सच्या विजयाचा निरोप आल्यानंतर नीता यांनी पुन्हा साईबाबांचे मुखदर्शन घेतले. त्यानंतरच त्यांनी साईमंदिर परिसर सोडला.

नीता यांनी शुक्रवारी सकाळीही साईदर्शन घेतले. मुलगा अनंत याचा गुरुवारी आणि आज पती मुकेश यांचा वाढदिवस असल्याने नीता यांनी साईबाबांचे दर्शन घेऊन प्रार्थना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 03:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...