'बॉम्बे ब्लड ग्रुप'चा रक्तदाता हवाय !

या रक्तगटाची एक कष्टकरी महिला प्रसुतीसाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालीय. या महिलेला रक्ताची नितांत आवश्यकता

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2017 11:50 PM IST

'बॉम्बे ब्लड ग्रुप'चा रक्तदाता हवाय !

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

 03 एप्रिल :  तुम्हाला बॉम्बे ब्लड ग्रुप हा रक्तगट माहीत आहे ? आपल्यापैकी बहुतेकाना कदाचित या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाविषयी माहिती नसेल. पण या रक्तगटाची एक कष्टकरी महिला प्रसुतीसाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालीय. या महिलेला  रक्ताची नितांत आवश्यकता असून तिचा जीव वाचवण्यासाठी बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रक्तदात्यानी पुढे यावं असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांकडून करण्यात आलंय.

अंजली हेळकर ही चिरेखाणीवर काम करणारी महिला आपल्या पहिल्याच प्रसुतीसाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. अंजलीच्या रक्तातलं हिमोग्लोबीन अत्यंत कमी आढळल्यामुळे तिला कुठल रक्त द्याव लागेल याच्या चाचण्या जेव्हा करण्यात आल्या तेव्हा इथल्या रक्ततपासणी तज्ञांच्या लक्षात आलं की अंजलीच रक्त बॉम्बे ब्लड ग्रुपच आहे.

अत्यंत दुर्मिळ अशा या रक्तगटाचा शोध सर्वात पहिल्यांदा मुंबईत लागल्यामुळे या रक्तगटाला बॉम्बे ब्लड ग्रुप हे नाव देण्यात आलंय. पण, या गटाचे रक्तदाते अत्यंत कमी असल्यानुळे हे रक्त उपलब्ध करणं ही मोठी समस्या आरोग्य यंत्रणेला भेडसावतेय.

अधिपरिचारक मॅथ्यू शाईन म्हणतात, "ज्यावेळेस बाॅम्बे रक्तगट आपल्याकडे येतो एखादा रुग्ण त्यावेळेस त्याला रक्त कशा प्रकारे उपलब्ध करून द्यायच हा एक तिढा आमच्या रक्तपेढीसमोर सतत आहे कारण की तो दुर्मिळ रक्तगट आहे. परत हे रक्त आपण घेऊन सुध्दा ठेऊ शकत नाही कारण त्या रक्ताचा पेशंट उपलब्ध नसेल तर ते रक्त आपल्याला टाकून द्याव लागेल."

Loading...

जागतिक लोकसंख्येपैकी फक्त चार दशसहस्रांश लोकसंख्या बाॅम्बे ब्लड ग्रुपची आहे. भारतामध्ये बाॅम्बे ब्लड ग्रुपचे केवळ 179 रुग्ण आहेत तर मुंबईत फक्त 35 ते चाळीस जणाचा ब्लड ग्रुप बाॅम्बे पॉझिटिव्ह आहे.  त्यामुळे हा रक्तगट असणाऱ्यानी आपल्या रक्तगटाची माहिती ऑनलाईन कम्युबिटिइवर दिली तर त्याचा फायदा गरीब रुग्णाचा जीव वाचवण्यात होणार आहे.

अंजलीची प्रसुती अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलीय. त्यामुळे तिला वेळेत रक्त मिळाव या अपेक्षेने रत्नागिरीच्या जिल्हा शल्यस्चिक्त्सकानी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून रक्तदात्याना आवाहन केलंय.

जिल्हा शल्यचिकित्सक ए आर आरसूलकर म्हणतात, " आम्ही असं आवाहन करतो की, ज्या एरियामध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपचे डोनर असतील त्यानी रक्त द्याव स्वत:हून पुढे यावं इथं जेणेकरून त्या महिलेचा जीव वाचवणे म्हणा किंवा इतर गोष्टी शक्य होतील ."

रक्तदान हेच जीवनदान असं म्हटलं जातं. अंजली आणि तिच्या होणाऱ्या बाळाला हे जीवदान मिळावं यासाठी बॉम्ब्बे ब्लड ग्रुप च्या रक्तदात्यानो कृपया रत्नागिरी जिल्हा रुग्नालयाशी संपर्क करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 11:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...