पायल रोहतगीवर गुन्हा दाखल करा अन्यथा राज्यभरात आंदोलन, राष्ट्रवादीचा इशारा

बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीट करून त्यांचा अपमान केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 05:39 PM IST

पायल रोहतगीवर गुन्हा दाखल करा अन्यथा राज्यभरात आंदोलन, राष्ट्रवादीचा इशारा

मुंबई, 3 जून- बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीट करून त्यांचा अपमान केला आहे. जाणता राजाचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.तिच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायल रोहतगी हिच्यावर कारवाई करणार नसतील तर याविरोधात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन राष्ट्रवादी उभारेल, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

पायल रोहतगीचे पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट केले आहे. 'जो हिन्दु होकर हिन्दुत्व के ख़िलाफ़ बोलता है उसे हिजड़ा कहते है', असे हिंदुत्वाबाबत पायलने ट्वीट केले आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून ती वादग्रस्त वक्तव्यांनी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला सवाल

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पायल ही सोशल मीडियावर उलटसुलट पोस्ट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

Loading...

आत्मविश्वासच आणतोय तिला अडचणीत..

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटवर काहींनी पायलचे कौतुक केले तर काहींना तिच्यावर कडाडून टीका केली आहे. पायलने आपला मुद्दा ठामपणे मांडला आहे. परंतु आता तिचा हाच आत्मविश्वास तिला अडचणीत आणताना दिसत आहे. पायलने शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे ट्वीट तिने करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ट्विटर, इन्स्टाग्रामवर तिने स्वतःचा आणि पती संग्राम सिंगचे फोटो शेअर करत छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले, असा सवालही तिने केला आहे.

दरम्यान, नाव नथुराम गोडसेची पाठराखण केलेल्या व्हिडिओमुळे पायल सुरुवातीला चर्चेत आली होती. तिने कमल यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, कमल यांना म्हातारचळ लागल्याचे म्हटले होते. तिने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत 'कमल यांना दहशतवाद आणि खून याच्यातला फरक कळत नाही. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी गोडसे नसून जिना होते,' असे म्हटले होते.


VIDEO:विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींनी मिरवल्या तलवारी आणि एअर रायफल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2019 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...