Elec-widget

आमदार राम कदमांना राष्ट्रवादी महिला आघाडीने दिला साडीचोळी, बांगड्यांचा आहेर

आमदार राम कदमांना राष्ट्रवादी महिला आघाडीने दिला साडीचोळी, बांगड्यांचा आहेर

भाजपचे आमदार राम कदम यांना गुरुवारी पंढरपुरात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

  • Share this:

पंढरपूर, 6 जून- भाजपचे आमदार राम कदम यांना गुरुवारी पंढरपुरात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भाजपचे आमदार महिलांचा अवमान करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीने आमदार कदम यांना साडीचोळी आणि बांगड्याचा आहेर देऊन निषेध केला. अलीकडेच गुजरातमधील एका भाजप आमदाराने महिलेला मारहाण करून शिवीगाळ केली होती. तसेच समाजातील इतर महिलांचा अवमानही केला होता.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज पंढरपुरात बैठक होती. या बैठकीसाठी आमदार राम कदम हे पंढरपुरात आले भक्त निवासात हा प्रकार घडला. 'आमदार राम कदम..हाय हाय, भाजप सरकार.. हाय हाय' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

राम कदम यांच्या 'त्या' वक्तव्याचा राज्यभरातून तीव्र निषेध

दरम्यान, 'तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार राम कदम यांनी मुंबईत दहीहंडीच्या उत्सवात केले होते. तेव्हा राम कदम यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला होता. अनेक जिल्ह्यांत राम कदमांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. विरोधकांसह सर्वसामान्यांनी राम कदम यांच्या या वादग्रस्त विधानाबद्दल संताप व्यक्त केला असून, त्यांच्यावर महिला वर्गही संतप्त झाला आहे. पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतून राम कदम यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध झाला होता.

सांगलीत प्रतिमेस मारले जोडे

Loading...

सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीने राम कदम यांचा कडाडून निषेध केला होता. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली होती.

पुण्याच्या तरुणीने दिले होते ओपन चॅलेंज

राम कदम यांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. पुण्यातील एका मुलीने तर राम कदम यांनी ओपन चॅलेंज दिले होते. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून या तरुणीने राम कदम यांनी खडेबोलही सुनावले होते.

काय म्हणाली ही तरुणी..?

'जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्रशंभू, मी मीनाश्री पाटील पुण्याहून बोलतेय, काल घाटकोपरमधल्या दहीहंडी उत्सवामध्ये राम कदम यांनी एक वक्तव्य केलं होतं. तुम्हाला मुलगी आवडली की मला एक कॉल करा, मी तिला उचलायला मदत करतो. राम कदम तुम्हाला मी चॅलेंज करतेय. मला तुम्ही मुंबईमध्ये बोलवा किंवा मी मुंबईमध्ये येते. मला तुम्ही फक्त एक बोट लावून दाखवा. बाकी पुढचं उचलून नेण्याची गोष्ट मी नंतर बघते, तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे, ते अत्यंत लांच्छनास्पद आहे, शिवाय आपण महाराष्ट्रात राहतो. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, इथं स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यांची इथे महाराष्ट्रामध्ये जागा नाहीये. तुम्ही ज्या काही प्रकरणावर बोललेला आहात ना, मला त्याची शहानिशा करायची आहे. भेटूयात आपण आमने सामने, तुमच्या फोनची मी नक्कीच वाट बघेन, आजपर्यंत तुम्हाला मी खूप कॉल केले होते. याच्या आधीच्याही तुमच्या काही वक्तव्यांवर कॉल केले होते. शिवाय आताही मी कॉल केले होते. पण तुम्ही कॉलचं अॅन्सर केलेलं नाहीयेत. आता प्रतीक्षा मला तुमच्या कॉलची आहे सर, नक्की कॉल करा मला, तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. हे चॅलेंज तुम्ही स्वीकारावं ही माझी अपेक्षा आहे.

धन्यवाद..'


लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार, राऊत यांच्या दाव्यामुळे ठिणगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com