Elec-widget

पंतप्रधान उज्ज्वला योजना 'जुमले' की योजना, राष्ट्रवादीचा मोदी सरकारवर घणाघात

पंतप्रधान उज्ज्वला योजना 'जुमले' की योजना, राष्ट्रवादीचा मोदी सरकारवर घणाघात

उज्ज्वला योजनेच्या नावाखाली देशाच्या आणि राज्याच्या महिलांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा काम मोदी सरकारने केलेले आहे - राष्ट्रवादी काँग्रेस

  • Share this:

बुलडाणा, अमोल गावंडे, 12 एप्रिल- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'मोदी सरकारची सुरुवात 'अब की बार मोदी सरकार','चौकीदार चोर है' सांगत झाली. मात्र, बुलडाणा हा जिजाऊंचा जिल्हा आहे. या जिल्ह्याची प्रगती महाराजपर्यंत सर्वांनी पाहिलेलं आहे. या जिल्ह्यात जर महाराज असते ते तर सत्ताधाऱ्यांनी ढकलून दिले असते', असा घणाघात मोदी सरकारवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी बुलडाण्यात केला. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिगणेंच्या प्रचारा रॅलीदरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांला मत का देऊ नये, हे यावेळी चित्रा वाघ यांनी मतदारांना पटवून दिले.

आघाडीचे उमेदवार डॉ.शिगणेंच्या प्रचारार्थ चित्रा वाघ यांनी बुलडाणा शहरात प्रचाररॅली काढून जनतेस डॉ.शिगणेंना निवडून आणण्यासाठी आवाहन केले. मुस्लीम बहुल भागात मुस्लीम महिलांच्या बैठक घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला का मत देऊ नये?, हे पटवून सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत दिलं तर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येण्यासाठी हातभार लागेल हे देखील यावेळी मुस्लिम महिलांना वाघ यांनी समजून सांगितलं. तर गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक आश्वासने दिली गेली. दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, असे मोदींनी सांगितले होते. मात्र ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही. या उलट महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यांच्या मालाला भाव नाही, उज्ज्वला योजनेच्या नावाखाली देशाच्या आणि राज्याच्या महिलांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा काम मोदी सरकारने केलेले आहे. कनेक्शन मोफत अशी घोषणा शासनाने केली. मात्र कनेक्शनवर अन्न शिजत नाही. त्यासाठी सिलिंडर लागतो आणि सिलिंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. महिलांची सुरक्षा हा अतिशय ऐरणीवरचा प्रश्न आहे.

गुन्हेगारीदेखील वाढली आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे मोदी सरकार 'बेटी बचाव'चा नारा देत आहे. फक्त घोषणा देऊन बेटी वाचणार नाही तर त्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कायदे बनले मात्र त्याची अंमलबजावणी नाही यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. यासर्व बाबी आम्ही घराघरापर्यंत घेऊन जात आहोत.आणि यासाठी आघाडीचे शासनच आवश्यक असल्याचे मतदारांना देत आहोत, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.

राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 11:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...