News18 Lokmat

पटोलेंशी मतभेद नाही, भंडारा-गोंदिया जागा राष्ट्रवादीच लढवणार-प्रफुल्ल पटेल

नाना पटोले यांच्याशी मतभेद संपले आहे, येणाऱ्या काळात सोबत कार्य करू, ते माझे लहान भाऊ आहेत अशी प्रतिक्रीया पटेल यांनी दिली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 5, 2018 05:55 PM IST

पटोलेंशी मतभेद नाही, भंडारा-गोंदिया जागा राष्ट्रवादीच लढवणार-प्रफुल्ल पटेल

भंडारा, 05 मे : नाना पटोले यांच्याशी मतभेद संपले आहे भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार असेल, उमेदवारीची 9 तारखेला घोषित करू अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

भाजपला रामराम ठोकून नाना पटोले काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेस प्रवेशामुळे त्यांच्या मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. पण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी निवडणुकीसाठी उत्सुक्ता दाखवली. एवढंच नाहीतर या मतदारसंघातून राष्ट्रवादीच लढणार असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे नाना पटोले नाराज झाले. ते राहुल गांधी यांची भेट घेणार आहे.

आज प्रफुल्ल पटेल यांनी, नाना पटोले यांच्याशी मतभेद संपले आहे, येणाऱ्या काळात सोबत कार्य करू, ते माझे लहान भाऊ आहेत अशी प्रतिक्रीया पटेल यांनी दिली.

तसंच छगन भुजबळ यांना जामीन मिळाच्याच आनंद आहे आणि भविष्यात ते निर्दोष ही सुटतील अशी अपेक्षा आहे, मात्र त्यांना मुद्दाम जामीन मिळू न देण्यासाठी सरकार ने प्रयत्न केले आहे, तरीही आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2018 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...