News18 Lokmat

Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीकडून माढा आणि नगरचा सस्पेन्स कायम

माढा आणि नगरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार कोण? यावरचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 04:12 PM IST

Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीकडून माढा आणि नगरचा सस्पेन्स कायम

मुंबई, 15 मार्च : लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अमोल कोल्हे - शिरूर, समीर भुजबळ- नाशिक, बजरंग सोनवणे- बीड, आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली. गुरूवारी राष्ट्रवादीनं पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता दुसऱ्या यादीत 5 उमेदवारांची नावं जाहीर केली. पण, अद्याप देखील नगर आणि माढाच्या जागेबाबत सस्पेन्स कायम आहे. माढामधून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवार कोण? याची चर्चा रंगली आहे. तर, नगरमध्ये देखील उमेदवाराची प्रतिक्षा आहे. नगरच्या जागेकरता काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे आग्रह धरला होता. पण, राष्ट्रवादीनं मात्र नगरची जागा सोडण्यास साफ नकार दिला. अखेर डॉ. सुजय विखे - पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगरमधील सामना हा चुरशीचा होणार आहे. पण, राष्ट्रवादीकडून माढा आणि नगर या दोन्ही जागी देखील उमेदवार कोण? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


शरद पवार VS बाळासाहेब विखे पाटील : 1991 च्या निवडणुकीत काय घडलं होतं ?


विखे - पवार यांचा नगरच्या जागेवरून वाद

Loading...

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावरून आघाडीमध्ये ही बिघाडी झाली आहे. सुजय विखे पाटील यांच्यासाठी नगरची जागा सोडायला शरद पवार यांनी नकार दिला तेव्हापासूनच शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातला वाद विकोपाला जाणार, अशी चिन्हं दिसत होती आणि अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या जुन्या वादानं डोकं वर काढलं.

यावेळी चव्हाट्यावर आलेला हा वाद विकोपाला गेला होता 1991 च्या निवडणुकीत. तेव्हाही शरद पवार आणि बाळासाहेब विेखे पाटील यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरूच होत्या. त्यातच बाळासाहेब विखे पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरुद्ध बंडाचं निशाण फडकवलं होतं.


lok sabha elections 2019 शिरूरमध्ये रंगणार अमोल कोल्हे आणि आढळरावांची लढाई


राष्ट्रवादीची पहिली यादी

- बारामती- सुप्रिया सुळे

- सातारा- उदयनराजे भोसले

-ठाणे- आनंद परांजपे

-जळगाव- गुलाबराव देवकर

-बुलढाणा- राजेंद्र शिंगणे

-परभणी- राजेश विटेकर

- उत्तर पूर्व- संजय दिना-पाटील

-कल्याण- बाबाजी पाटील

-कोल्हापूर- धनंजय महाडिक

-लक्षद्विप- मोहम्मद फैझल

हातकणंगलेची जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडल्याचे देखील जयंत पाटील यांनी सांगितले.

VIDEO: युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड है टूटेगा नाही- मुख्यमंत्री


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...